शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सिम्बायसिसचे कॅ म्पस नागपुरात

By admin | Updated: January 6, 2017 02:33 IST

नागपूर महापालिकेने जमीन सिम्बायसिसला उपलब्ध केली असून या विद्यापीठाच्या कॅम्पसच्या भूमिपूजनाचा समारंभ सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे

आज भूमिपूजन : नागपूरच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी नागपूर : नागपूर महापालिकेने जमीन सिम्बायसिसला उपलब्ध केली असून या विद्यापीठाच्या कॅम्पसच्या भूमिपूजनाचा समारंभ सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शा.ब.मुजूमदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्र वारी सकाळी १० वाजता वाठोडा येथे संपन्न होणार आहे. नागपूरकरांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. दर्जेदार शिक्षण देणे हा सिम्बायसिसचा ध्यास असून ‘गुणवत्ता’हा श्वास आहे. अशी ग्वाही सिम्बायसिसच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी गुुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर व परिसरातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्राचे दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी सिम्बायसिस ही संस्था नागपुरात यावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही होते. सिम्बायसिसच्या संचालक मंडळाने देखील त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला. सिम्बायसिस मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नागपूर व परिसरातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येईल. अशा गुणवान विद्यार्थ्यांच्या शुल्कात १५ टक्के सूट देण्यात येईल. अशी माहिती विद्या येरवडेकर यांनी दिली. कॅम्पसमध्ये व्यवस्थापन, विधी आणि डिझाईन या शाखा सुरू होणार असून बी.बी.ए., एल.एल.बी., फॅशन आणि टेक्सटाईल डिझाईन या विषयाचे अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. तसेच आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, कम्युनिकेशन या क्षेत्रातील कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम, एव्हीएशन, एअरपोर्ट लॉजिस्टिक असे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ,सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. रामन, विधी विभागाच्या अधिष्ठाता डॉ. शशिकला गुरुपुरे, सिम्बायसिस इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनचे संचालक डॉ. विनय मुंदडा, सिम्बायसिसच्या आरोग्य इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते. (वा. प्र.)