शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

नागपूर जिल्ह्यात सर्वेक्षणात सापडले ६४१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:37 PM

Nagpur district, Collector,Corona Positive ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार ८७० घरांना भेटी देऊन सुमारे १४ लाख २१ हजार ११३ व्यक्तींची आरोग्यविषयक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. १ हजार ९९४ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू असून या सर्वेक्षणामध्ये ६४१ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ३.४८ लाख घरांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार ८७० घरांना भेटी देऊन सुमारे १४ लाख २१ हजार ११३ व्यक्तींची आरोग्यविषयक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. १ हजार ९९४ पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू असून या सर्वेक्षणामध्ये ६४१ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली.या अभियानांतर्गत सारी व संशयित कोरोनाबाधित ७६७ रुग्ण आढळून आले असून त्यांची आरटीपीसीआर तपासणी केली असता ६४१ रुग्ण बाधित निघाले. त्यासोबतच १५,६२९ व्यक्ती मधुमेह आजाराचे, २,६७५ रुग्ण उच्च रक्तदाबाचे, २१९ रुग्ण किडनी आजाराचे, २०३ रुग्ण यकृताच्या आजाराचे तर १३,९६८ रुग्ण इतर व्याधींनी बाधित असल्याचे आढळून आले आहे.जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांच्या तपासणीमध्ये कळमेश्वर तालुक्यात ९५.७४ टक्के, रामटेक ९०.१५ टक्के, उमरेड ९३.२४ टक्के, भिवापूर ७१.३३ टक्के, कुही ७५.७७ टक्के, मौदा ७९.२३ टक्के, नरखेड ८८.७० टक्के, सावनेर ६३.८६ टक्के, हिंगणा ६३.९८ टक्के, पारशिवनी ५३ टक्के, कामठी ४८ टक्के, काटोल ४७.४६ टक्के, नागपूर ग्रामीण १६ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या तपासणीमध्ये नरखेड तालुक्यात १३० संशयितांची तपासणी केली असता १०३ सारी आजाराचे तर १७ कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नागपूर ग्रामीण ४२, कामठी ९२, हिंगणा ६४, काटोल ४३, सावनेर ८४, कळमेश्वर ९५, रामटेक १७, पारशिवनी ५७, मौदा २५, उमरेड १९, भिवापूर ४६ तर कुही तालुक्यात ४० बाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.१,७१७ आशांद्वारे सर्वेक्षणाचे काम‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या पथकांमध्ये १,७१७ आशा सर्वेक्षणाचे काम करीत असून त्यांच्या मदतीला १११ अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर