शहरं
Join us  
Trending Stories
1
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
2
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
3
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
4
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
5
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
6
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
7
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
8
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
9
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
10
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
15
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
16
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
17
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
18
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
19
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
20
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यावर ४८ घाव घालणारे दोघे न्यायालयाला शरण

By admin | Updated: May 20, 2014 00:53 IST

महालच्या राणासन बारसमोर भररस्त्यावर एका तरुणावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांनी ४८ घाव घालून भयावह खून करणार्‍या दोन आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च

 नागपूर : महालच्या राणासन बारसमोर भररस्त्यावर एका तरुणावर तीक्ष्ण व धारदार शस्त्रांनी ४८ घाव घालून भयावह खून करणार्‍या दोन आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाची लढाई हरल्यानंतर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयात शरणागती पत्करली. विश्वजीतसिंग वीरसिंग जाधव (३२) रा. कर्नलबाग मॉडेल मिल गेटजवळ आणि आशिष सदाशिव शिर्के (३३) रा. भोसला पॅलेस कोतवाली, अशी आरोपींची नावे आहे. यापूर्वी सीताराम मूलचंद शाहू आणि रजनीश ऊर्फ रॉकी हे पोलिसांना शरण आले होते. या चार आरोपींनी भूखंडाचा वाद आणि जुन्या भांडणावरून हातात तलवार, चॉपर, कुकरी घेऊन २० मे २०१३ रोजी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास सोमवारी क्वॉर्टर येथील रहिवासी रानू विनोद गाढवे (२४) या तरुणाचा निर्घृण खून केला होता. त्याचा गळा कापला होता आणि शरीरावर ४८ घाव घातले होते. मृताचा भाऊ वैभव याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३४, शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करून सर्व चारही आरोपींना अटक केली होती. १२ सप्टेंबर २०१३ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एम. लालवाणी यांच्या न्यायालयाने या चारही आरोपींना जामीन मंजूर केला होता. या जामीन आदेशाविरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्या. एम. एल. तहलियानी यांच्या एकलपीठाने २५ मार्च २०१४ रोजी अपील मंजूर करून चारही आरोपींचा जामीन रद्द केला होता. न्यायालयाने या चौघांनाही शरण येण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी शाहू आणि रॉकी हे शरण आले होते. तर जाधव आणि शिर्के हे जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे हे दोघे न्यायालयाला शरण आले. (प्रतिनिधी)