शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पित्याची चिमुकलीसह आत्महत्या

By admin | Updated: April 23, 2016 02:56 IST

बेरोजगारी आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक महिन्यापासून मानसिक तणावात जगणाऱ्या एका व्यक्तीने अडीच वर्षाच्या चिमुकलीसह

बेरोजगारी, आर्थिक अडचणीमुळे आले नैराश्य : गांधीसागर तलावात उडी घेतली नागपूर : बेरोजगारी आणि आर्थिक अडचणीमुळे अनेक महिन्यापासून मानसिक तणावात जगणाऱ्या एका व्यक्तीने अडीच वर्षाच्या चिमुकलीसह गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे घडलेली ही घटना सकाळी ७ नंतर चर्चेला आली. महेश रामकृष्ण भांदककर (वय ४२) आणि अदिती (वय अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. महालमधील संघ बिल्डींगच्या मागे भांदककर परिवार राहतो. महेशचे वडील वायुसेनेचे निवृत्त कर्मचारी असून, आई गृहिणी आहे. महेशचा नरेश नामक भाऊ वकील असून, ते जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतात. मेकॅनिक असलेल्या महेशचे संगीता (वय ३०)सोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी तो एका बँकेत रोजंदारीवर (डेलीवेजेस) कामावर होता. वर्षभरापूर्वी त्याला कामावरून कमी करण्यात आले. काही दिवस घरोघरी जाऊन गृहोपयोगी साहित्याची तो विक्री करीत होता. मात्र, त्यात त्याला स्वारस्य नसल्याने त्याने नंतर हे काम बंद केले. महेश रिकामाच राहत असल्याने घरातील खर्च चालविण्यासाठी संगीता गृहोपयोगी साहित्याची विक्री करून परिवाराचा गाडा रेटण्याचे प्रयत्न करायची. वारंवार सांगूनही महेश रोजगार शोधण्याचे नाव घेत नसल्याने त्याचा पत्नीसोबत नेहमीच वाद व्हायचा. आईवडील आणि भाऊसुद्धा त्याची समजूत काढून त्याला रोजगार शोधण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. मात्र, तो त्यांनाही उलटून बोलायचा. त्यामुळे त्यांच्यासोबतही त्याचा वाद व्हायचा. महेशचे भाऊ नरेश यांचे १९ एप्रिलला लग्न झाले. त्यामुळे घरात आनंदीआनंद होता. गुरुवारी बहुतांश पाहुणे निघून गेले. केवळ एक विवाहित बहीण मुक्कामी होती. गुरुवारी रात्री क्षुल्लक कारणावरून महेशचा त्याच्या कुटुंबीयांसोबत वाद झाला. थोड्या वेळेतच शांत झालेला महेश जेवण करून झोपला. पहाटे ४ च्या सुमारास चिमुकल्या अदितीला घेऊन तो घराबाहेर पडला. गांधीसागर तलावावर गर्दी भल्या सकाळी चिमुकलीसह दोघांचे मृतदेह गांधीसागर तलावाच्या पाण्यावर आढळल्याने अल्पावधीतच तेथे मोठी गर्दी जमली. माहिती कळताच गणेशपेठ पोलिसांचे पथक तलावावर पोहचले. दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. दरम्यान, मृताची ओळख पटविण्याचे पोलीस प्रयत्न करीत असतानाच कुण्या एकाने दिलेल्या माहितीवरून महेशच्या नातेवाईकांनी तेथे धाव घेतली. त्यांनी हे मृतदेह महेश आणि अदितीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करून मृतदेह रुग्णालयात पाठविले. ही वार्ता कळताच महेशच्या शेजाऱ्यांमध्ये तीव्र शोककळा पसरली.