घरगुती कारणावरून विषारी औषध घेऊन आत्महत्या, नागपुरातील घटना
By दयानंद पाईकराव | Updated: June 21, 2023 19:12 IST2023-06-21T19:12:24+5:302023-06-21T19:12:48+5:30
किरकोळ घरगुती कारणावरून विषारी औषध घेऊन एका ४७ वर्षाच्या व्यक्तीने आत्महत्या केली.

घरगुती कारणावरून विषारी औषध घेऊन आत्महत्या, नागपुरातील घटना
नागपूर: किरकोळ घरगुती कारणावरून विषारी औषध घेऊन एका ४७ वर्षाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. लोकेश मनोहर बागेश्वर (वय ४७, रा. विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलनी, बाळाभाऊपेठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी घरगुती कारणावरून रविवारी १८ जूनला दुपारी एक वाजता खटमल मारण्याचे विषारी औषध प्राशन केले.
त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना नातेवाईकांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे बुधवारी २१ जूनला पहाटे चार वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सूचनेवरून पाचपावली ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.