अचानक वाढली भाजीपाला व फळांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:27 AM2020-04-23T10:27:36+5:302020-04-23T10:29:05+5:30

बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.

Sudden increase in vegetable and fruit shops | अचानक वाढली भाजीपाला व फळांची दुकाने

अचानक वाढली भाजीपाला व फळांची दुकाने

Next
ठळक मुद्दे एक व्यवसाय बंद पडला, दुसरा स्वीकारलाताळेबंदीत बदलला मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात १९ पासून आणि देशात २४ मार्चपासून टाळेबंद लागली असून, महिनाभरापासून अनेक उद्योग ठप्प पडले आहेत. लहान-मोठे व्यवसाय करून प्रपंच चालविणाऱ्यांची कामेही बंद झाली आहेत. कर्ज काढून व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते भरण्यापासून ते कुटुंब चालविण्याच्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी दुसरा मार्ग स्वीकारला आहे. एक व्यवसाय बंद होताच दुसरा सुरू केला आहे. सरकारने या टाळेबंदीतून औषधालय, किराणा आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक गोष्टी वगळल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी भाजीपाला आणि फळे विक्रीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शहरात अचानक भाजीपाल्याची आणि फळांची दुकाने वाढली आहेत.
मंगेश, उमेश व विनोद यांचाही ट्रॅव्हल्सचा व्यवसाय या टाळेबंदीत बंद पडला आहे. त्यांनी कर्ज काढून वाहने खरेदी केली होती. त्यामुळे कर्जाचा हप्ता फेडण्याची अडचण त्यांना येणार आहे. त्यांच्या घरातील ते एकटेच कमावणारे असल्याने कुटुंबाची चिंता लागून आहे. त्यामुळे मित्रांनी मिळून टरबूज विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जवळची गुंतवणूक केल्याने रिस्क असून व्यवसाय बुडाला तर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्वांनी रिस्क घेऊन हा व्यापार सुरू केला. आर्थिक प्रश्न मिटला नसला तरी बऱ्याच अंशी कमी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या मित्रांप्रमाणे अनेकांनी दुसऱ्या व्यवसाय सुरू केला आहे. यातही सोपा मार्ग म्हणून फळे आणि भाजीपाला विक्रीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच की काय शहरात भाजी विक्री आणि फळे विक्रीची दुकाने वाढल्याचे दिसून येत आहे.

हा प्रकार गंभीर पण...
लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला गेला असताना अशाप्रकारे व्यवसाय सुरू करणे चिंतेचे कारण आहे. लोकांचा रोजगार गेल्याने पर्याय नसल्याने वेगळे मार्ग निवडले आहेत. मात्र अचानक भाजीची दुकाने वाढणे हा सुद्धा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Sudden increase in vegetable and fruit shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.