'पिनाका' रॉकेटची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी; नागपुरातील सोलर ग्रुपच्या प्रयत्नाने महत्त्वाचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:11 IST2026-03-19T15:10:10+5:302026-03-19T15:11:38+5:30

Nagpur : सोलर इंडस्ट्री इंडिया समूहाने विकसित केलेल्या 'पिनाका एक्स्टेंडेड रेंज (ईआर)' रॉकेटची राजस्थानमधील पोखरण येथे बुधवारी यशस्वी चाचणी करण्यात आली.

Successful test of 'Pinaka' rocket in Pokhran; Important milestone achieved by the efforts of Nagpur-based Solar Group | 'पिनाका' रॉकेटची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी; नागपुरातील सोलर ग्रुपच्या प्रयत्नाने महत्त्वाचा टप्पा

Successful test of 'Pinaka' rocket in Pokhran; Important milestone achieved by the efforts of Nagpur-based Solar Group

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
सोलर इंडस्ट्री इंडिया समूहाने विकसित केलेल्या 'पिनाका एक्स्टेंडेड रेंज (ईआर)' रॉकेटची राजस्थानमधील पोखरण येथे बुधवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नागपूरच्या सोलर ग्रुपने या चाचणीत एकूण २४ रॉकेट्सची अचूकता, प्रहारक्षमता आणि सातत्याची क्षमता तपासली. ही चाचणी ६ हजार कोटींच्या ऑर्डरच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली असून, ५० किमीपेक्षा अधिक मारक क्षमतेचे हे स्वदेशी रॉकेट सिस्टम भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आले आहे. सोलर इंडस्ट्रीजची उपकंपनी सोलर डिफेन्स अॅण्ड एअरोस्पेस लिमिटेड यांनी या रॉकेट्सची निर्मिती केली आहे. पिनाका ईआर प्रणाली एकावेळी १२ रॉकेट्स अवघ्या ४४ सेकंदांत डागू शकते, जे आधीच्या एमके-१ आवृत्तीच्या तुलनेत अधिक प्रगत आहे. एमके-१ ची रेंज सुमारे ४० किमी होती, तर पिनाका ईआर आवृत्ती ५० किमीपेक्षा अधिक अंतरावर मारा करू शकते.

ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला असून, आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ मिळणार आहे. सीमावर्ती भागातील जुन्या तोफखाना प्रणालींची जागा आधुनिक प्रणाली घेणार आहे.

सोलर ग्रुपने या प्रकल्पासाठी प्रोपेलंट्स आणि वॉरहेड्ससारख्या स्फोटक घटकांच्या निर्मितीत विशेष प्रावीण्य मिळवले असून, भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Web Title : पोखरण में पिनाका रॉकेट का सफल परीक्षण; नागपुर के सोलर ग्रुप की महत्वपूर्ण उपलब्धि

Web Summary : सोलर ग्रुप नागपुर द्वारा विकसित पिनाका एक्सटेंडेड रेंज रॉकेट का पोखरण में सफल परीक्षण किया गया। 50 किमी से अधिक रेंज वाला यह स्वदेशी रॉकेट सिस्टम भारतीय सेना के लिए है। इससे बड़े पैमाने पर उत्पादन का मार्ग प्रशस्त होता है, और 'आत्मनिर्भर भारत' पहल को बढ़ावा मिलता है।

Web Title : Pinaka Rocket Successful Test in Pokhran; Nagpur's Solar Group Milestone

Web Summary : The Pinaka Extended Range rocket, developed by Solar Group Nagpur, successfully test-fired in Pokhran. The domestically produced rocket system with over 50km range is for the Indian Army. This paves the way for mass production, boosting the 'Atmanirbhar Bharat' initiative.

टॅग्स :nagpurनागपूर