झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नागपुरात स्वागत

By कमलेश वानखेडे | Updated: November 23, 2023 15:58 IST2023-11-23T15:56:42+5:302023-11-23T15:58:32+5:30

नक्षलवाद्यांचा गड उद्वस्त करण्यात यश - हेमंत सोरेन

Success in destroying the stronghold of Naxalites - Jharkhand CM Hemant Soren | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नागपुरात स्वागत

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नागपुरात स्वागत

नागपूरझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे गुरुवारी (दि. २३) दुपारी नागपूर विमानतळावर आगमन झाले.  नागपुरात आगमन झाले. यावेळी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चाईबासा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे. या संदर्भात बोलताना झारखंडचे मुख्यमंत्री हे हेमंत सोरेन म्हणाले, त्या ठिकाणी नक्षल विरोधी मोहीम सुरू आहे. तीन-चार दिवसांपूर्वी देखील एक अशी घटना घडली होती. आमचे जवान आणि सीआरपीएफ जवान मिळून नक्षलवाद्यांचा पूर्ण सफाया करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचा तो गड होता, तो गड पूर्णपणे उध्वस्त करण्यात आम्हाला यश आलेले आहे, असे मत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केले. काँग्रेस नेते अविनाश पांडे यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन नागपुरात दाखल झाले आहेत.

Web Title: Success in destroying the stronghold of Naxalites - Jharkhand CM Hemant Soren