शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

उपराजधानी गारठली : पारा ६.३ अंशांवर घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:30 IST

देशाच्या उत्तर भागातील शीतलहरीचा प्रभाव नागपुरातदेखील जाणवत आहे. केवळ पाच दिवसांत नागपुरातील किमान तापमान ८.७ अंशांनी घसरले आहे. शनिवार तर नागरिकांची परीक्षाच घेणारा ठरला. २४ तासात ६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. गारठ्यामुळे सायंकाळनंतर तर घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले होते. सरासरीहून ६ अंशांनी तापमान कमी असल्यामुळे अतिशीतलहरीची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देथंडीचा झाला ‘वार’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या उत्तर भागातील शीतलहरीचा प्रभाव नागपुरातदेखील जाणवत आहे. केवळ पाच दिवसांत नागपुरातील किमान तापमान ८.७ अंशांनी घसरले आहे. शनिवार तर नागरिकांची परीक्षाच घेणारा ठरला. २४ तासात ६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. गारठ्यामुळे सायंकाळनंतर तर घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले होते. सरासरीहून ६ अंशांनी तापमान कमी असल्यामुळे अतिशीतलहरीची स्थिती निर्माण झाली आहे.शुक्रवारी ८.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले होते. मात्र शनिवारी पारा आणखी २ अंशांनी घसरला. शनिवारी कमाल २८ तर किमान ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. वातावरण कोरडे असल्याने व उत्तर भारतात थंडी पडल्याने मध्य भारतातील तापमान घटले आहे. सूर्यास्त झाल्यानंतर रस्त्यांवर थंडीचा प्रभाव जाणवायाला लागतो. रात्री ९ वाजेनंतर तर तुरळक गर्दीच दिसून आली. शिवाय धुक्याचादेखील प्रभाव कायम आहे. दिवसा चांगले ऊन असतानादेखील थंडी जाणवत होती.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भासह मध्य भारतात येत्या ४८ तासांत तापमानात आणखी घट नोंदविल्या जाऊ शकते. त्यामुळे उपराजधानीचा पारा आणखी खाली उतरू शकतो.विदर्भात नागपूर सर्वात ‘कूल’ 

विदर्भातदेखील थंडीचा कडाका जाणवतो आहे. शनिवारी नागपूरपाठोपाठ यवतमाळ येथे ९ अंश सेल्सिअस, ब्रम्हपुरीत ९.२ अंश सेल्सिअस तर गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. सर्वात जास्त किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस इतके होते व त्याची वाशीम येथे नोंद झाली.आतापर्यंतचे सर्वात कमी तापमानदिवस                  तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)२९ डिसेंबर २०१४      ५.०२९ डिसेंबर १९६८     ५.५२८ डिसेंबर १९८३     ५.७२२ डिसेंबर २०१८      ६.३सहा दिवसांचे किमान तापमानदिवस                किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)१७ डिसेंबर              १५.६१८ डिसेंबर              १५.०१९ डिसेंबर              ९.६२० डिसेंबर             ८.६२१ डिसेंबर             ८.३२२ डिसेंबर            ६.३यंदा ‘रेकॉर्ड’ मोडणार का ?नागपूरमध्ये डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. चार वर्षाअगोदर २९ डिसेंबर २०१४ रोजी किमान तापमान ५ अंशांवर पोहोचले होते व हा एक ‘रेकॉर्ड’ होता. हा शहरातील सर्वात थंड दिवस ठरला होता. यंदा थंडीचा ‘रेकॉर्ड’ मोडणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. २८ डिसेंबर २०१७ रोजी किमान तापमान ७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. २० डिसेंबर २०१६ रोजी ७.८ अंश सेल्सिअस, २६ डिसेंबर २०१५ रोजी ७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. यंदा तर पारा सरासरीहून ३ ते ४ अंशांनी घसरला आहे.काय आहे शीतलहरज्यावेळी तापमान सरासरीहून पाच अंश किंवा त्याहून कमी होते, तेव्हा त्याला शीतलहरीच्या श्रेणीत ठेवण्यात येते. तर जर पारा सरासरीहून सात किंवा अधिक अंशांनी घसरला तर त्याला अतिशीतलहर मानण्यात येते. सद्यस्थितीत नागपूरचे किमान तापमान ६ अंशांहून खाली गेले आहे. त्यामुळे नागपूरची अतिशीतलहरीकडे वाटचाल होत आहे.

 

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर