शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 11, 2014 01:15 IST

नागपूर विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूरचे उपजिल्हाधिकारी आर.एन.जैन यांची वर्धा येथे तर विभागीय आयुक्त

राव गोंदियात, जैन वर्धेला: जोशींकडे गोसेखुर्द
नागपूर : नागपूर विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूरचे उपजिल्हाधिकारी आर.एन.जैन यांची वर्धा येथे तर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त केएनके राव यांची गोंदियात बदली झाली आहे. गोंदियाचे डी.व्ही. सावरकर हे राव यांची जागा घेणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विभागातील महसूल खात्यातील बदल्यांकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. कोणाच्या बदल्या होणार आणि कोण थांबणार याचीही चर्चा रंगत होती. ९ तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयाने विभागातील ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार गोंदियाचे उपविभागीय अधिकारी डी.व्ही. सावरकर यांची नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर बदली झाली आहे. सावरकर यांच्या जागेवर नागपुरातील उपायुक्त के.एन.के. राव जाणार आहेत. उपजिल्हाधिकारी आर.एन. जैन (पेंच प्रकल्प २) यांची उपजिल्हाधिकारी वर्धा येथे बदली झाली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नागपूरचे सचिव अजय रामटेके यांची चंद्रपूर येथे उपजिल्हाधिकारी (अतिरिक्त) या पदावर बदली झाली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनिता मेश्राम यांची उपजिल्हाधिकारी भंडारा या पदावर तर राजेंद्र अहिवर यांची आर्वीचे उपविभागीय अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात
आली आहे. भंडाऱ्याचे उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी यांची बदली नागपूर येथे उपजिल्हाधिकारी (गोसेखुर्द-२) या पदावर झाली आहे. भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी एस.डी. कुळमेथे यांची बदली चंद्रपूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे.
वर्धेचे उपजिल्हाधिकारी (उर्ध्व वर्धा प्रकल्प) एम.एच. टोणगावकर यांची उपविभागीय अधिकारी कुरखेडा येथे, कुरखेड्याचे उपविभागीय अधिकारी आर.बी. खजांजी यांची उपजिल्हाधिकारी चंद्रपूर येथे तर गोंदियात सध्या उपजिल्हाधिकारी (रोहोयो) म्हणून कार्यरत जयप्रकाश अंबादे यांची सेवा त्यांच्या मूळ विभागाकडे प्रत्यावर्तीत करण्यात आली आहे.
बदल्यांची आणखी एक यादी जाहीर होण्याची शक्यता असून त्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा अधिक काळ घालविणारे काही अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत. त्यांची नावे पहिल्या यादीत नाही. हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)