शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो नवे तंत्रज्ञान अवगत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:50 IST

जनसंवाद अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. माध्यम क्षेत्राच्या कक्षा आता व्यापक झाल्या आहेत.

सुधीर गव्हाणे : धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये जनसंवाद सत्रारंभलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसंवाद अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. माध्यम क्षेत्राच्या कक्षा आता व्यापक झाल्या आहेत. जनसंवादाच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी जनसंवाद विभागप्रमुख तथा एम.आय.टी. पुण्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. धनवटे नॅशनल कॉलेज, पंजाबराव देशमुख इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्चच्या जनसंवाद विभागाच्या नवीन सत्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागप्रमुख डॉ. बबन नाखले, नागेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंवाद व पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातून त्यांच्या कामाची गती व गुणवत्ता नक्कीच वाढेल. आता नवमाध्यमांचे जग आहे. सोशल मीडिया हे खूप मोठे आहे. यातही रोजगाराच्या अनेक संधी आहेत. प्रत्येकजण हा अद्वितीय असतो. प्रत्येकात काही ना काही विशेष गुण असतात. आपल्या आत असलेल्या त्या विशेष गुणाचा शोध घ्यावा. त्याला विकसित करावे. त्याचाच व्यावसायिक उपयोग केला पाहिजे, असेही डॉ. गव्हाणे म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरेही दिली. जनसंवाद विभागप्रमुख डॉ. बबन नाखले यांनी प्रास्ताविकातून माजी विद्यार्थ्यांनी व्यावहारिक जगात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. संचालन मनीषा देशमुख यांनी केले. यावेळी प्रा. अशोक भड, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तुनवार, डॉ. आशिष उजवणे, संदेश सिंगलकर, अभिषेक आचार्य यांच्यासह जनसंवाद विद्याविभागाचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.