शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अवयवांचे कार्य : मेडिकलमध्ये अवयव प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:14 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) तीन दिवसीय अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी विविध शाळांच्या ६००वर विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी ६००वर विद्यार्थ्यांनी दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शरीरातील अवयवांविषयी प्रत्येकाला कुतूहल असते. अवयवांचे कार्य कसे चालते, प्रत्यक्ष दिसायला कसे असतात, याची उत्सुकता असते. याच उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) तीन दिवसीय अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी विविध शाळांच्या ६००वर विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. मंगळवारी याचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे आदी उपस्थित होते.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मानवी शरीरातील अवयव जतन करून ठेवले जातात. ते अवयव सर्व सामान्य नागरिकांना पाहता यावेत, अवयवांची काळजी घेऊन आजारांना कसे दूर ठेवता यावे या विषयी जनजागृती व्हावी म्हणून मेडिकलतर्फे वर्षातून एकदा अवयवांचे प्रदर्शन भरविले जाते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मेडिकलच्या स्टुडंट कौन्सिलच्या मदतीने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात या प्रदर्शनाचे आयोजन केले.प्रदर्शनात मेंदू, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, छोटी आतडी, मोठी आतडी, स्पायनल कॉड, स्वादूपिंड या शिवाय, कवटी, हाताचे-पायाच्या हाडासह इतरही भागातील हाड आदी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. हृदयाचे पम्पिंग कसे होते, मेंदूच्या कोणत्या भागात कोणत्या शरीराचे कार्य अवलंबून असते, फुुुुुफ्फुसाचे कार्य कसे चालते, लठ्ठ लोकांची चरबी यकृतात कशी जाते. यकृत निकामी होते म्हणजे काय होते, मूत्रपिंडाचे कार्य कसे चालते, त्याच्या आत काय असते, अशा अनेक गोष्टी वैद्यकीय विद्यार्थी शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात अवयव देऊन त्यांचा वैद्यकीय शिक्षणाशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्नही या निमित्ताने होत आहे.विशेष म्हणजे, प्रदर्शनात भेट देण्याऱ्या विद्यार्थ्यांचे व लोकांच्या गर्दीचे मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे. प्रदर्शनाच्या आयोजनासाठी उपअधिष्ठाता डॉ. कुंभलकर, स्टुडंट कौन्सिलचे प्रमुख डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष सचिन भोसले, वैभव गरड, प्रणील वारुळकर, सुमया शेख, चैतन्य अग्रवाल आदी परिश्रम घेत आहेत.प्रदर्शन २७ तारखेपर्यंतमेडिकलमध्ये आयोजित हे अवयव प्रदर्शन २७ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. परंतु प्रत्येक सेशनची वेळ ठरलेली असल्याने त्या वेळेत विद्यार्थ्यांनी हजर राहण्याचे आवाहन केले आहे. पहिले सेशन सकाळी ९ ते दुपारी १२, दुसरे सेशन दुपारी १२ ते ३ तर तिसरे सेशन ३ ते ६ वाजेपर्यंतचे आहे.दरवर्षी चार हजार विद्यार्थ्यांची भेट -डॉ. गावंडेडॉ. अविनाश गावंडे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना आपल्या अवयवांची माहिती व्हावी, त्यांची काळजी घेतली जावी, हा अवयव प्रदशर््न मागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष अवयव हातात घेऊन वैद्यकीय विद्यार्थी ही माहिती देत असल्याने ते नेहमी स्मरणात राहते. गेल्या वर्षी या प्रदर्शनाला चार हजारावर विद्यार्थ्यांनी भेट दिली होती.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयStudentविद्यार्थी