शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी अनुभवली गावाची समृद्धी

By admin | Updated: January 8, 2017 02:25 IST

ग्रामीण जीवनाचे अनुभव शहरी मुलांसाठी दुर्मिळच. ग्रामीण व्यवस्था ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

सोमलवारमध्ये साकारली निकालस वाडी नागपूर : ग्रामीण जीवनाचे अनुभव शहरी मुलांसाठी दुर्मिळच. ग्रामीण व्यवस्था ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपल्या संस्कृतीला जे सण, उत्सव लाभलेले आहेत ते खऱ्या अर्थाने आजही ग्रामीण भागातच साजरे होतात. शहरी मुलांना गावाची संस्कृती, तेथील वास्तव, जीवन आणि वातावरणाची अनुभूती देण्यासाठी सोमलवार हायस्कूलच्या निकालस शाखेने एक टुमदार गाव उभारून विद्यार्थ्यांना गावाची अनुभूती करून दिली. शाळेच्या पटांगणात विद्यार्थी आणि शिक्षकांनी एक छोटेसे गाव साकारले आणि त्याला ‘निकालस वाडी’ असे नाव दिले. या वाडीत अगदी हुबेहुब गावाचे वैभव उभे केले. गावाच्या वेशीला हनुमानाचे मंदिर, भविष्य सांगणारा ज्योतिष, गावाच्या कुशीवर बजरंग आखाडा, झाडाखालची शाळा, आठवडी बाजार, तणसाच्या झोपड्या, जाते, पाटा-वरवंटा, चुली, पितळ आणि तांब्याची भांडी, छकडा, बैलगाडी, गाय-वासरू, गारुडी, कुंभार असे सर्व चित्र निकालस वाडीत उभे केले होते. संगणक आणि व्हिडिओ गेमच्या आकर्षणात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या गावात कंचे, सागरगोट्या हे खेळही उपलब्ध केले होते. गावातील हातमाग व्यवसाय, कु टीर उद्योग, कठपुतळीचे खेळ हे सर्व वाडीत उभे केले होते. नागपंचमी, वटपौर्णिमा, पोळा हे पारंपरिक सणही या वाडीत साजरे करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या वाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण जीवन ही संकल्पना पुढे ठेवून शाळेच्या शिक्षिका सीमा जोशी व शिक्षक श्रीकांत धबडगावकर यांनी ही संकल्पना पुढे रेटली आणि विद्यार्थ्यांशी समन्वय साधून त्यांच्या मदतीने निकालस वाडी हे टुमदार गाव साकारले. ग्रामीण जीवनाचा आनंद लुटताना मुलांमध्ये कुतूहल दिसून आले. पालकांनीही निकालस वाडीला भेट देऊन या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे कौतुक केले. (प्रतिनिधी)