शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

नागपुरात बच्चू कडूंच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी जाळल्या पदव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 7:55 PM

महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेशीमबागच्या जैन कलार समाज भवनात आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात पदव्या जाळून मुंडन आंदोलन केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे मुंडन आंदोलन महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात तसेच संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्र पीएसआय, एसटीआय आणि असिस्टंटच्या परीक्षा घेण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेशीमबागच्या जैन कलार समाज भवनात आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात पदव्या जाळून मुंडन आंदोलन केले.अँन्टी महापरीक्षा पोर्टल समितीच्या वतीने सोमवारी जैन कलार समाज भवन, उमरेड रोड येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जैन कलार समाज मंडळाचे अध्यक्ष अनिल अहिरकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. बच्चू कडू म्हणाले, हा लढा जाती, धर्म वा पंथाचा नाही तर शेतकऱ्यांच्या अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलांचा लढा आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला असून दुसरीकडे त्याच्या मेहनत करणाऱ्या मुलांना महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षेत भ्रष्टाचार करून अधिकारी होऊ न देण्या

षडयंत्र रचल्या जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. महाराष्ट्र शासनाने महापोर्टलचा भ्रष्टाचार दहा दिवसात बंद करावा, अन्यथा मुंबईत मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात महापरीक्षा पोर्टल बंद करा, संयुक्त परीक्षा बंद करून स्वतंत्र पीएसआय, एसटीआयच्या परीक्षा घ्याव्या, एमपीएससीने उत्तर पत्रिकेसाठी बारकोड प्रणालीचा वापर करावा, राज्यशासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावली, तलाठी पदाची परीक्षा एमपीएससीद्वारे घेऊन जास्तीत जास्त पदे भरावीत, १८ हजार शिक्षकांची भरती त्वरित करावी, सहाय्यक वाहन मोटार निरीक्षक नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील करून नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आदी मागण्या रेटून धरण्यात आल्या. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनातील पाच विद्यार्थ्यांनी मुंडन करीत महापरीक्षा पोर्टलच्या दशक्रियेचा विधी पार पाडला. यावेळी आ. कडूंच्या नेतृत्वात रेशीमबाग चौक ते सक्करदरा चौकादरम्यान मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यशस्वितेसाठी प्रशांत काकडे, विनायक तडस, राहुल पोटे यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ