शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

अपमानास्पद वागणुकीमुळे केला होता विद्यार्थ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 10:44 PM

आईवडिलांसमोर अपमान केल्यामुळेअल्पवयीन विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने कौस्तुभ सवाईचा खून केला होता. पोलिसांनी खुनाच्या सूत्रधारासह दोन अल्पवयीन व त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन सूत्रधारासह तिघांचा समावेश : नवी कामठी पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आईवडिलांसमोर अपमान केल्यामुळेअल्पवयीन विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने कौस्तुभ सवाईचा खून केला होता. पोलिसांनी खुनाच्या सूत्रधारासह दोन अल्पवयीन व त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे.राहुल रमेश येरपुडे (१८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रामभूमी सोसायटी पारडी येथील रहिवासी १७ वर्षीय कौस्तुभ दामोदर सवाईचा २९ सप्टेबरला कामठीच्या घोरपडमध्ये खून करण्यात आला होता. त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून ३० सप्टेबरला पारडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. २ ऑक्टोबरला घोरपड येथे मृतदेह सापडला. ३ ऑक्टोबरला मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस कौस्तुभच्या मित्रांच्या तपासात लागले. पोलिसांना २९ सप्टेबरला सकाळी कौस्तुभ आपल्या वयाच्या आरोपीसोबत दिसल्याची माहिती मिळाली. चौकशीत त्याने कौस्तुभला भवानी मंदिर गेटजवळ सोडल्याचे सांगितले.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने राहुल येरपुडेच्या मदतीने खून केल्याची माहिती दिली. राहुलला अटक केल्यानंतर एका दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यालाही पकडण्यात आले. कौस्तुभ आणि सूत्रधार १७ वर्षाचा विद्यार्थी जुने मित्र आहेत. डीजे समोर नाचण्यावरून कौस्तुभचा सूत्रधाराशी २८ सप्टेबरला वाद झाला होता. कौस्तुभने आरोपीचा त्याच्या आईवडिलांसमोर अपमान केल्यामुळे तो संतापला होता. त्याने कौस्तुभचा खुन करण्याचे ठरविले. त्याने राहुल येरपुडेला आपल्या योजनेत सामील केले. राहुल प्लंबरचे काम करतो. तो कौस्तुभचा लहानपणीचा मित्र आहे. योजनेनुसार २९ सप्टेबरला सूत्रधार आणि राहुलने कौस्तुभला अ‍ॅक्टिव्हावर बसवून कामठी घोरपडला नेले. तेथे त्यांनी कौस्तुभशी वाद घातला. दरम्यान सूत्रधाराने कौस्तुभच्या डोक्यावर वार केला. राहुलने त्याला पकडून ठेवले. त्यानंतर कौस्तुभ जीव वाचविण्यासाठी पळत असताना दोघांनीही त्याचा पाठलाग करून दगडाने ठेचून त्याचा खून केला. मृतदेहाला शेतात फेकून कौस्तुभचा मोबाईल घेतला. घटनास्थळ निर्जन असल्यामुळे घटनेची कुणालाच माहिती मिळाली नाही. खुनानंतर त्यांनी एका दुसºया अल्पवयीन मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली. दोघेही हर्षच्या तुमसर येथील घरी गेले. तेथे कपडे बदलून त्याला कौस्तुभचा मोबाईल सोपविला. तेथून ते नागपुरात परतले. ही कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष बाकल, उपनिरीक्षक विनोद धोंगडे, ज्ञानेश्वर कांडेकर, हवालदार ज्ञानचंद दुबे, पप्पु यादव, प्रमोद वाघ, वेद यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, मंगेश गिरी, सतीश ठाकुर, सुधीर कनोजिया, ललित शेंडे यांनी पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनStudentविद्यार्थीArrestअटक