नागपुरात परीक्षेच्या तोंडावर बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:25 IST2018-02-13T00:24:14+5:302018-02-13T00:25:08+5:30
एका शिक्षकाच्या १८ वर्षीय मुलाने १२ वीच्या परीक्षेच्या तोंडावर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना प्रतापनगर हद्दीत त्रिमुर्तीनगर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

नागपुरात परीक्षेच्या तोंडावर बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका शिक्षकाच्या १८ वर्षीय मुलाने १२ वीच्या परीक्षेच्या तोंडावर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना प्रतापनगर हद्दीत त्रिमुर्तीनगर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
रितीक दिलीप बोके (१८) प्लॉट नं. ४७, मलीका अपार्टमेंट, एनआयटी गार्डनसमोर त्रिमूर्तीनगर असे मृतक विद्याथ्यार्चे नाव आहे. वडील दिलीप बोके हे शिक्षक आहेत. त्यांना रितीक हा एकुलता एक मुलगा असून अभ्यासात तो हुशार होता. १० वीत त्याने ९३ टक्के गुण प्राप्त केले होते. यंदा १२ वीला शिकत होता. पोलीस सुत्रानुसार, १२ वीची परिक्षा तोंडावर आली होती. काही दिवसापूर्वी कॉलेजमधून परिक्षा प्रवेश पत्र सुद्धा आणले होते. मात्र रविवारी रितीकने टोकाचा निर्णय घेतला. मुलाच्या मृत्युने बोके कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले. याप्रकरणी प्रतापनगर पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली.