शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे देशप्रेम व अहिंसेवर सादरीकरण

By admin | Updated: April 20, 2016 03:15 IST

श्वेतांबर जैन समाजाच्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती, पश्चिम नागपूरच्या वतीने मंगळवारी सायंकाळी मुंडले सभागृहात भगवान महावीर यांचा...

भगवान महावीर जन्मकल्याणक सांस्कृतिक कार्यक्रम : पश्चिम नागपूर श्वेतांबर जैन समाजाचे आयोजननागपूर : श्वेतांबर जैन समाजाच्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती, पश्चिम नागपूरच्या वतीने मंगळवारी सायंकाळी मुंडले सभागृहात भगवान महावीर यांचा अहिंसा, सत्य, त्याग, तप आदींचा संदेश देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. जैन धर्माच्या विभिन्न शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी सादरीकरण केले. मुख्य अतिथी म्हणून लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, वरिष्ठ तपस्वी घेवरचंद झामड, नवनीतभाई शेठ, निखिल कुसुमगर, मानकचंद सेठिया, रणजितसिंह बघेल, कांतिलाल झामड, रसीलाबेन कुसुमगर, शैलेंद्र मानावत, भावना मानावत, गिरीश पांडव, सुनील मानसिंहका, संजय चोरडिया उपस्थित होते.कार्यक्रमात श्रीमद् राजचंद्र डिव्हाईन ट्रस्ट ‘अर्हत टच’ संस्था, संस्कार शाळा आणि सुमतिनाथ शाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष सादरीकरण केले. प्रीती जैन, लवीना अमेसर, सतीश श्रीवास्तव, अनिषा शर्मा आणि अथ तिवारी यांनी भगवान महावीर यांच्या सिद्धातांवर भाषण दिले. कार्यक्रमात जैन समाजाचे युवक, वरिष्ठजन, महिला आणि छोटी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. छोट्या मुलांनी आकर्षक सादरीकरण केले. संचालन धीरज मालू यांनी केले. (प्रतिनिधी)शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संघर्षाकडे वेधले लक्षसंस्कार शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या वेशात दहशतवाद संपुष्टात आणताना प्राणाची आहुती देण्यावर सादरीकरण केले. सैनिक युद्धात शहीद होतात, पण त्यांच्या कुटुंबीयांना कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो, यावर प्रभावी सादरीकरण केले. लहानांनी हेलिकॉप्टर उडविणे, बंदूक चालविणे आणि युद्धभूमीत लढाईचे दृश्य साकार केले. त्याला उपस्थितांनी भरपूर दाद दिली. यापूर्वी अर्हत टच संस्थेच्या चमूने भगवान महावीर यांच्या जन्मापासून निर्वाणपर्यंतची झांकी सादर केली. श्वेतांबर जैन समाजाची भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती, पश्चिम नागपूरतर्फे मंगळवारी मुंडले सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, वरिष्ठ तपस्वी घेवरचंद झामड, नवनीतभाई शेठ, निखिल कुसुमगर, मानकचंद सेठिया, रणजितसिंह बघेल, कांतिलाल झामड, रसीलाबेन कुसुमगर, शैलेन्द्र मानावत, भावना मानावत, गिरीश पांडव, सुनील मानसिंहका, संजय चोरडिया उपस्थित होते.