शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

...अन् परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यानं घरासमोर प्राण सोडला; ट्रकच्या धडकेत करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 5:47 PM

ट्रकच्या जोरदार धडके विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

नागपूर (हिंगणा) : ट्रकने विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजता तिवस्कर वाडीत घडली. घरासमोरच विद्यार्थ्याचा प्राण गेला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. रायपूर तिवस्करवाडी येथील ऋषीकेश भैयाजी बागडे (१५) या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा नेहरू विद्यालयात इंग्रजी माध्यमात नववीत शिकत होता. आज त्याचा इंग्रजीचा पेपर होता. सर्दी खोकला झाल्याने तो सकाळी ९.३० वाजता सायकलने रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी निघाला. त्यावेळी तिवस्कर वाडीत राहणाऱ्या वासुदेव तिवस्कर यांच्या मालकीच्या ट्रकचा (एम.एच. ३२ बी ४७२०) चालक गजानन निखाडे रायपूर गावात जाण्यासाठी निघाला होता.भरधाव ट्रकने ऋषीकेशच्या सायकलला जबर धडक दिली. ट्रकच्या मागच्या चाकात सायकल आल्याने ऋषीकेश आत खेचला गेला. अपघातात सायकलचे दोन तुकडे झाले. ऋषीकेशच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले. यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने पळाला. ऋषीकेश अभ्यासात हुशार होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू