नागपुरात मान्सूनची दमदार एन्ट्री : रस्ते, नाले तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 21:12 IST2018-06-09T21:11:57+5:302018-06-09T21:12:11+5:30
गोवा-मुंबईत धडकलेल्या मान्सूनची खऱ्या अर्थाने शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेपासून उपराजधानीत धुंवॉधार ‘एन्ट्री’ झाली.

नागपुरात मान्सूनची दमदार एन्ट्री : रस्ते, नाले तुडुंब
ठळक मुद्देउकाड्याने त्रस्त नागपूरकरांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोवा-मुंबईत धडकलेल्या मान्सूनची खऱ्या अर्थाने शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेपासून उपराजधानीत धुंवॉधार ‘एन्ट्री’ झाली. नाले तुडुंब भरून वाहिले, रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले. रेनकोटविना बाहेर पडलेल्यांची त्रेधा उडाली अन् दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांना पावसाने सुखद अनुभूती दिली.