शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

हंसापुरीत घरे पाडल्याने तणाव

By admin | Updated: June 28, 2014 02:42 IST

मध्य नागपुरातील हंसापुरी परिसरात नाल्याच्या शेजारी उभारण्यात आलेली १६ पक्की घरे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमिनदोस्त केली.

नागपूर : मध्य नागपुरातील हंसापुरी परिसरात नाल्याच्या शेजारी उभारण्यात आलेली १६ पक्की घरे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमिनदोस्त केली. विरोधानंतरही कारवाई केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पथकावर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी नागरिकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. यात १५ वर्षीय युवक कमल उईके याचे डोके फुटले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी घटनास्थळी दाखल होत कारवाईला विरोध दर्शविला. खदान भागातील नाल्याच्या शेजारी काही नागरिकांनी पक्की घरे बांधली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते तेथे वास्तव्यास आहेत. महाल- गांधीबाग झोनच्या पथकाने नाल्याच्या शेजारी अतिक्रमण केल्याचे कारण देत शुक्रवारी ही घरे तोडण्यास सुरुवात केली. मदन गौर, शिवचरण नायक, दिवाकर तिवारी, छाया गौर, श्यामू गौर, जगतराम यादव, महेश बरमईया, रामकली गुडी आदींचे घर तोडण्यात आले. नागरिकांनी कारवाईला विरोध केला. पण पोलीस बळाचा वापर करीत कारवाई करण्यात आली. आपद्ग्रस्त नागरिकांनी या कारवाईची माहिती माजी मंत्री अनिस अहमद यांना मोबाईलवर दिली. सायंकाळी ५ च्या सुमारास अहमद घटनास्थळी पोहचले. त्यांनी कारवाई अन्यायकारक असून बांधकाम पाडणे थांबविण्याची मागणी केली. अहमद यांच्या पाठबळामुळे नागरिक अतिक्रमण विरोधी पथकावर संतापले. महापालिकेच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. या वेळी संतप्त नागरिकांनी पथकावर व जेसीबीवर दगडफेक केली. जेसीबी चालकाने पळ काढला. नागरिकांनी जेसीबीच्या काचा फोडल्या. या वेळी पोलिसांनी नागरिकांवर लाठीमार केला. यात बऱ्याच जणांना गंभीर जखमा झाल्या. महापालिकेच्या तक्रारीनंतर नागरिकांवर तहसील पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. अतिक्रमण पथकाने कारवाई दरम्यान येथे असलेले जुने मसोबा मंदिर पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला. या प्रकरणी अनिस अहमद म्हणाले, येथे राहणाऱ्या नागरिकांजवळ १९९५ चे फोटोपास आहे. आयुक्तांनी नाल्याच्या शेजारचे चार फूटापर्यंतचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. पण पथकाने पक्की घरे पाडली. पावसाळ्यात नागरिकांची घरे पाडताच येत नाही. १६ कुटुंबे पावसाळ्यात रस्त्यावर आली आहेत. ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य आहे. या कारवाईच्या विरोधात उद्या, आपण आयुक्तांची भेट घेऊ. घर तोडण्यात आलेल्या नागरिकांना पर्यायी जागा द्यावी व पक्के घर बांधून द्यावे, अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)