शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

नागपुरात रुजली, राज्यात विस्तारली पथनाट्य चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:35 AM

समाज परिवर्तनाच्या विचाराने प्रेरित झालेली ही पथनाट्य चळवळ उपराजधानीत रुजली आणि पुढे महाराष्ट्रभर बहरत गेली.

ठळक मुद्देसमाजाचे वास्तव मांडणारी परिवर्तनवादी नाट्यकलायोजनांच्या प्रचाराचेही प्रभावी माध्यम

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्यगृह, रंगमंच, पडदा आणि दिग्दर्शकांच्या निर्देशानुसार अभिनय करणारे कलावंत अशा साच्यात बंदिस्त असलेली नाट्यकला एवढीच ओळख १९७० पर्यंत प्रेक्षकांना होती. अशात समांतर सिनेमाप्रमाणे प्रायोगिक रंगभूमी मूळ धरू लागली होती. नाटकांच्या एका वेगळ्या प्रकाराने लोकांना भुरळ पाडली. रंगमंच नाही, पडदा नाही आणि ठरलेली संहिताही नाही. नाटक सजायचे ते रस्त्यावर कुठेही. हो, पण त्यात समाजातील समस्यांचे धगधगते वास्तव मात्र होते आणि हे वास्तव बहुसंख्य वर्गाच्या हृदयाला भिडले होते. हे होते पथनाट्य. समाज परिवर्तनाच्या विचाराने प्रेरित झालेली ही पथनाट्य चळवळ उपराजधानीत रुजली आणि पुढे महाराष्ट्रभर बहरत गेली.पथनाट्य ही नाट्यकला, नव्हे परिवर्तनाची चळवळ नागपूरच्या मातीत रुजविणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अस्वस्थ काळातील भारावलेला इतिहास मांडला. साधारणत: स्वातंत्र्याची दोन-तीन दशके लोटल्यानंतरचा तो काळ. जी आशा, अपेक्षा घेऊन स्वातंत्र्याची पहाट उगवली होती, ती पूर्ण होताना दिसत नव्हती. गरिबी, बेरोजगारी अशा समस्यांनी समाजमन होरपळत असताना तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरत होती. विद्रोही व दलित साहित्याच्या उदयाचाही हाच काळ. सिनेमाच्या भाषेत अमिताभ बच्चन नावाचे व्यक्तिमत्त्व उभे राहण्याचा काळ. अशा अस्वस्थ काळात सामाजिक व राजकीय जाणिवा असलेले ‘तिसरे थिएटर’ बादल सरकार आणि उत्पल दत्त यांच्या नेतृत्वात बंगालमध्ये बहरत होते व पथनाट्य या नावाने ते पंजाब, दिल्लीपर्यंत पसरले होते. खरं तर अगदी अमेरिकेतील निग्रोंचा लढा, जर्मनी ते जगभरात परिवर्तनाच्या आंदोलनामध्ये पथनाट्याने प्रचंड प्रभाव घातला होता. मात्र या काळात महाराष्ट्रतील नाट्य क्षेत्रात हे परिवर्तन यायचे होते. एका विशिष्ट वर्गाच्या कलादृष्टीपुरते मर्यादित असलेले हे क्षेत्र परिवर्तनवाद्यांना मात्र अस्वस्थ करीत होते. मुंबईत छबीलदास यांचे प्रायोगिक रंगभूमीने वाटचाल सुरू केली होती, तर विदर्भात काही परिवर्तनवादी तरुणांच्या हुंकारातून पथनाट्याचे वारे वाहू लागले होते.

रस्त्यावरील काव्यवाचन, सिंधी तरुणाचे पथनाट्यडॉ. श्रीपाद जोशी यांच्यानुसार त्या काळात हौशी व व्यावसायिक नाटक संस्थांना एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू असताना नवतरुणांमध्ये नवे काहीतरी करण्याची ऊर्मी लागली होती. याचदरम्यान देबाशिष रॉय या बंगाली दिग्दर्शकाद्वारे नागपुरात सादर होत असलेल्या बंगाली नाटकांनी एक नवी दृष्टी या तरुणांना दिली. साधारणत: १९७५-७६ च्या काळात रस्त्यावर काव्यपाठाचा उपक्रम सुरू झाला. अर्थात डॉ. जोशी यांची ललित कला संस्था व आंबेडकरी कवींची मुक्तीवाहिनी या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. हे पथकाव्य वाचन दर रविवारी आवळेबाबू चौकात रंगायचे, जे पुढे इतरही चौकात पसरू लागले. १९७७ मध्ये लक्ष्मीभुवन चौकात एक दिवस पथनाट्य सादरीकरणासाठी ठरला. अनिल चनाखेकर यांच्या नवप्रतिभा संस्थेचे कलावंत त्यात सहभागी होणार होते. ठरल्यानुसार काव्यवाचन सुरू झाले, मात्र चनाखेकर यांचे कलावंत पोहोचले नाही. याचवेळी श्रोत्यांमध्ये उपस्थित एका सिंधी तरुणाने पुढे येऊन ‘हनुमान जाग उठा’ या विषयावर १५ मिनिटांचे एकपात्री स्क्रिप्ट सादर केले आणि पथनाट्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.आणि सुरू झाला प्रवासयानंतर दीपक ढोणे या तरुणाने लिहिलेल्या ‘शेंगदाणा’ या नाटकाचे अनेक प्रयोग विविध चौकात सादर झाले. यात गजानन पांडे यांच्या नाटकांची पुढे भर पडली. ‘जादुगार आणि गारुडी’चे अनेक प्रयोग सादर झाले. त्यावेळी जीवन विरकट नावाच्या एसीपीने पथनाट्यासाठी शहरातील १२ चौकांना कायम परवानगी दिली. खरे तर या नव्या नाट्यकलेने लोकांना भारावून सोडले होते आणि याची ख्याती बाहेरही पसरत होती. अकोला येथे एका नाट्य स्पर्धेचा परीक्षक म्हणून गेल्यानंतर तेथील आयोजकांनी पथनाट्य बसविण्याचा आग्रह केला. तेव्हा १५ दिवसात त्यांच्यासाठी पथनाट्य तयार केल्याची आठवण डॉ. जोशी यांनी नमूद केली. पुढे अकोल्याच्या या संस्थेने अरविंद देशमुख यांच्या लेखनातून बुलडाण्यापर्यंत पथनाट्याचे ३०० पेक्षा जास्त प्रयोग केले. पथनाट्यातून लेखक निर्माण झाले, त्यासाठी स्वतंत्र संहिता तयार झाल्या. अगदी टीव्हीचा प्रसार होईपर्यंत पथनाट्य कला प्रचंड बहरली होती.साहित्य संस्कृती मंडळाची मान्यतापथनाट्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघता त्यावेळचे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांतर्गत पथनाट्याची स्वतंत्र समिती तयार केली व ५००० रुपये अनुदान जाहीर केले. या माध्यमातून पुढे रायपूरपासून गोव्यापर्यंत कलावंतांनी पथनाट्यांचे प्रयोग करीत महाराष्ट पिंजून काढला होता. वामन पात्रीकर यांचे ‘बाजारपेठ’, ज.रा. फणसाळकरांचे ‘माणसाचा केला देव’ यांच्यासह गजानन सगदेव, दिलीप ठाणेकर, अतुल भुसारी, प्रमोद भुसारी अशा लेखकांचे पथनाट्य महाराष्ट्रत गाजले.दलित रंगभूमीशी एकरूपमहाराष्टष्ट्रत दलित व विद्रोही साहित्याच्या उगमानंतर पथनाट्य हा कलाप्रकार दलित रंगभूमीशी जणू एकरूप झाला. प्रतिष्ठित कला, साहित्यापासून दूर ठेवण्यात आलेल्या या समाजाने पथनाट्याला आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम बनविले. संजय जीवने, प्रभाकर दुपारे, अमर रामटेके अशा नाटककारांनी पथनाट्याच्या संहिता लिहिल्या व सादर केल्या. हे नाट्य माध्यम महाराष्ट्रत पसरले.प्रचारनाट्य ते कॉलेज कट्टापथनाट्य आता समाजाची अस्वस्थता आणि परिवर्तनापुरते मर्यादित राहिले नव्हते. ते प्रचाराचे व प्रबोधनाचे मोठे साधन झाले होते. हुंडा विरोध, स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण संरक्षण, बेटी बचाओ, साक्षरता मोहीम, व्यसनमुक्ती अशा जनजागृतीसाठी ते एक प्रभावी माध्यम ठरले, शिवाय राजकीय पक्षांचे प्रचाराचेही ते साधन झाले. महाविद्यालयीन तरुणांमध्ये याचा प्रचार झपाट्याने झाला, हेही विसरता येणार नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिक