शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 9:26 PM

नागपूर शहरात सुमारे ९० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. रात्रीला कामावरून घरी परतणारे कुत्र्यांमुळे दहशतीत असतात. दुचाकी वाहन दिसले की कुत्रे धावतात. यामुळे अनेकदा अपघात होतात. तसेच लहान मुलांना चावण्याचा घटना वाढल्या आहेत.

ठळक मुद्देमनपाचा नसबंदीचा उपक्रम नावापुरताचखासगी संस्थाकडून प्रतिसाद नाहीशहरातील नागरिकांची त्रासातून तूर्त सुटका नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात सुमारे ९० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. रात्रीला कामावरून घरी परतणारे कुत्र्यांमुळे दहशतीत असतात. दुचाकी वाहन दिसले की कुत्रे धावतात. यामुळे अनेकदा अपघात होतात. तसेच लहान मुलांना चावण्याचा घटना वाढल्या आहेत. तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याला आळा घालण्यासाठी बेवारस कुत्र्यांवर नसबंदी होण्याची गरज आहे. यासाठी दोन वर्षात अनेकदा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. परंतु महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांची उदासीनता, सक्षम यंत्रणेचा अभाव, निधीची कमतरता व नियोजनाचा अभाव यामुळे सध्यातरी शहरातील नागरिकांची मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता नाही.प्रस्तावाला अनेकदा मंजुरी ; कार्यवाही शून्यमागील चार-पाच वर्षांपासून कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम बंद आहे. गतकाळात महिन्यापूर्वी सोसायटी फॉर प्रिव्हन्शन आॅफ क्रुरिटी अ‍ॅनिमल व व्हेस्टस् फॉर अ‍ॅनिमल (सातारा) या दोन संस्थांवर नसबंदीची जबाबदारी सोपविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. परंतु हा प्रस्ताव बारगळला. काही दिवसांपूर्वी शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालयामार्फत नसबंदीचा उपक्रम हाती घेतला. परंतु दिवसाला जेमतेम एका कुत्र्यांवर नसबंदी केली जात होती. काही दिवसातच हा उपक्रम बंद पडला. वर्धा येथील पीपल्स फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला नसबंदीचे काम देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु उपयोग झाला नाही. तसेच मारव्हा एसपीसीएल या संस्थेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु या संस्थेकडे सक्षम यंत्रणा नसल्याने फारसा उपयोग झाला नाही.सक्षम यंत्रणेचा अभावकुत्र्यांवर नसबंदी करता यावी यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. परंतु या दृष्टीने कोणत्याही स्वरूपाचे नियोजन करण्यात आलेले नाही. नसबंदी केंद्रात कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ज्या काही पाच-दहा कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्या जातात, त्यातील ५० टक्के यशस्वी होत आहे. यामुळे कुत्र्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप विविध संघटनांचा आहे. महापालिकेच्या  कोंडवाडा  विभागाकडे मनुष्यबळ नाही. निधीचाही अभाव आहे. अशा अडचणीमुळे हा उपक्रम कागदोपत्रीच राबविला जात आहे.

टॅग्स :dogकुत्राTerror Attackदहशतवादी हल्ला