भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याला रस्त्यावर ओढत लचके तोडले, आई धावली अन्...; व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 00:21 IST2023-04-14T00:16:33+5:302023-04-14T00:21:04+5:30
या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

प्रतिकात्मक फोटो
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र सुदैवाने, या हल्ल्यातून आपल्या चिमुकल्याला वाचविण्यात आईला यश आले आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
चुमुकल्यामागे लागले भटके कुत्रे -
नागपूरमध्ये मंगळवारी एका 3 वर्षांच्या मुलावर पाच-सहा कुत्र्यांनी हल्ला केला. या कुत्र्यांनी मुलाची पॅन्ट पकडून त्याला रस्त्यावर ओढले. यानंतर त्यांनी त्याला घेरले आणि चावायला सुरुवात केली. यानंतर, मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत आली आणि त्यांनी रस्त्यावरील दगड कुत्र्यांच्या दिशेने भिरकावत आपल्या मुलाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.
#WATCHमहाराष्ट्र: नागपुर में तीन साल के बच्चे पर आवारा कुत्तों ने हमला किया। (11.04)
— ANI_HindiNews (@AHindinews) April 13, 2023
(वीडियो सीसीटीवी का है) pic.twitter.com/5A6dQdhVHC
घटना सीसीटीव्हीत कैद -
सीसीटिव्ही म्हध्ये दिसत आहे, की चिमुकल्याच्या आईने कुत्र्यांच्या दिशेने दगड भिरकावल्यानंतर कुत्रे पळून गेले.ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमरॅत कैद झाली आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याने संबंधित चिमुकला जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.