लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: दोन दिवसांच्या असह्य उकाड्यानंतर सोमवारी दुपारी आकाशात पाहता पाहता काळे ढग गोळा झाले आणि वादळीवाऱ्यासह नागपुरात मान्सूनचे जोरदार पदार्पण झाले.यंदा पावसाचे आगमन वेळेवर होणार याची वार्ता असली तरी, लहरी पावसाचा काही नेम नाही म्हणून बळीराजा धास्तावला होता. तसेच कडक उन्हं व असह्य उकाडा याने नागरिकही त्रस्त झाले होते. आज कोसळलेल्या पर्जन्यवृष्टीने शेतकऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
नागपुरात पावसाचे झंझावाती आगमन; बळीराजासह नागरिक सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 14:41 IST