शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचार्‍यांचे मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन

By admin | Updated: May 25, 2014 00:45 IST

वीज कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २७ मे रोजी संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. माहिती सूत्रानुसार गत २१ मे रोजी मुंबई

नागपूर : वीज कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २७ मे रोजी संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. माहिती सूत्रानुसार गत २१ मे रोजी मुंबई येथील वर्कर्स फेडरेशनच्या कार्यालयात झालेल्या संयुक्त सभेत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार २७ मे रोजी कृती समितीमधील सर्व कर्मचारी संघटनांच्या नेतृत्वात राज्यभरातील वीज कंपन्यांच्या सर्कल कार्यालयासमोर धरणे-निदर्शने करून जाहीर सभा घेणार आहेत.

वीज कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तांत्रिक, अतांत्रिक, अभियंता व लेखा विभागातील कर्मचार्‍यांवर वाढलेला कामाचा बोजा कमी करण्यासाठी नवीन कर्मचार्‍यांची भरती करावी, महावितरण, वीज निर्मिती व पारेषण या तिन्ही कंपन्यांमधील अपघात व जीवित हानी टाळण्यासाठी उपाययोजना आखण्यात याव्या, महावितरणच्या अधिकार्‍यांकडून कर्मचार्‍यांवर होणारा अन्याय, दडपशाही, दंडात्मक कारवाई, आरोपपत्र, निलंबन व एकतर्फी शिक्षा देण्याची पद्घत ताबडतोब थांबवावी, निकृष्ट कोळशाचे कारण पुढे करून औष्णिक विद्युत केंद्रातील संच बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, महानिर्मिती कंपनीच्या अधिकारातील जल विद्युत प्रकल्प दुसर्‍याला हस्तांतरीत न करता स्वत:च चालवावा, कंत्राटी-आऊटसोर्सिंग कर्मचार्‍यांची रोजंदारी कामगार म्हणून नियुक्ती करावी, कर्मचार्‍यांच्या सेवाशर्ती, शैक्षणिक पात्रता व वयाची अट आदीसंबंधी एकतर्फी केलेले बदल रद्द करून सहायकांची कंत्राटी पद्घत बंद करावी, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ८३ हजार वीज कर्मचारी, अभियंते व अधिकार्‍यांच्या पगारवाढीचा करार गत ३१ मार्च २0१३ रोजी संपला असून, त्याला एक वर्षापेक्षा अधिकचा अवधी लोटला आहे. मात्र असे असताना अजूनपर्यंत नवीन करार करण्यात आलेला नाही. हा नवीन करार पुढील पाच वर्षांसाठी होणे आवश्यक आहे. परंतु त्यासंबंधी अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)