'राज्य सरकारची मदत तोकडी, पण केंद्र सरकारनेही मदत करायला पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:27 PM2021-10-14T14:27:46+5:302021-10-14T14:27:56+5:30

'देवेंद्र फडणवीसांना दिवसाढवळ्या स्वप्न पडत आहेत.'

'The state government should help, but the central government should also help' | 'राज्य सरकारची मदत तोकडी, पण केंद्र सरकारनेही मदत करायला पाहिजे'

'राज्य सरकारची मदत तोकडी, पण केंद्र सरकारनेही मदत करायला पाहिजे'

Next

नागपूर:राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. पण, शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजवर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'शेतकऱ्यासाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. मदत तोकडी आहे हे सत्य आहे, मात्र डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने मदत करायला पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी अहे, पण ही तात्काळ केलेली मदत आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा भरीव मदत करण्याच्या सूचना करणार आहोत. पण, केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी मदत करायला पाहिजे, केंद्राने मदत केल्यावर परिस्थिती सुधारेल.

वडेट्टीवारांची नाराजी दूर करणार
यावेळी नाना पटोले यांनी विजय वडेट्टीवारांच्या नाराजीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी लवकरच वडेट्टीवारांशी बोलणार आहे. त्यांची जर काही नाराजी असेल तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलेल आणि ओबीसी व भटक्या विमुक्तांना निधी मिळत नसेल तर या समाजासाठी सरकारवर दबाव आणून न्याय मागितला जाईल.

फडणवीसांना दिवसा स्वप्न पडताहेत
यावेळी नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. देवेंद्र फडणीस हे माझे मित्र सर्वांना माहिती आहे. पण, त्यांना दिवसा स्वप्न पडतात हे काही बरोबर नाही. त्यांना एकदा पहाटेचं स्वप्न पडलं होतं, पण आता दिवसाच स्वप्न पडण योग्य नाही, असा टोला पटोलेंनी लगावला.

राजनाथ सिंह यांनी देशाच्या सुरक्षेवर लक्ष द्यावं

नाना पटोलेंनी यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही निशाणा साधला. सावरकरांनी 1911 मध्ये पत्र लिहिलं त्याबद्दल त्यांना साठ रुपये पेन्शन मिळत होती आणि महात्मा गांधी 1915 मध्ये भारतात आले. पण त्या काळातला मोदींकडे मोबाईल असेल ते राना सिंग यांना सांगितलं असेल, असा टोला पटोलेंनी लगावला. तसेच, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे काही बोलले तरी देशाने त्यांना सोडून दिलं आहे. मात्र राजनाथ सिंग सारख्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशाप्रकारचे वक्तव्य करुन विषय डायव्हर्ट करण्यापेक्षा संरक्षण मंत्री म्हणून आपल्या जबाबदारीकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, असंही पटोले म्हणाले.

Web Title: 'The state government should help, but the central government should also help'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app