शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिष्यवृत्तीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:30 IST

फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आघाडी सरकारच्या काळातही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटलेला नाही. यातच परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्तीबाबत सामाजिक न्याय विभागाची कमालीची उदासीनता दिसून येते. विभागाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. परिणामी विदेशी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे मागासवर्गीय विद्यार्थी ताटकळत बसले आहेत. राज्य शासनाच्या या भूमिकेमुळे कसा होणार सामाजिक न्याय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमागासवर्गीय विद्यार्थी ताटकळत : कसा होणारा सामाजिक न्याय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आघाडी सरकारच्या काळातही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटलेला नाही. यातच परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्तीबाबत सामाजिक न्याय विभागाची कमालीची उदासीनता दिसून येते. विभागाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. परिणामी विदेशी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे मागासवर्गीय विद्यार्थी ताटकळत बसले आहेत. राज्य शासनाच्या या भूमिकेमुळे कसा होणार सामाजिक न्याय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीद्वारे अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांत उच्चशिक्षणाची संधी प्राप्त करून देण्यात देते. अशाच प्रकारे इतर मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गासही परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या योजना उपलब्ध आहेत. अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाने परदेशी शिष्यवृत्तीची नवी जाहिरात काढलेली होती. त्यातील क्रिमिलेयरच्या अन्यायकारक अटींवरून संपूर्ण महाराष्ट्रात संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्या अनुषंगाने केलेल्या ऑनलाईन आंदोलनाद्वारे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या राज्य सरकारने घेतलेली भूमिका मान्य नसलेली समजताच १९ मे, २०२० रोजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या वादग्रस्त निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर ११ मे रोजीच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या जाहिरातीलासुद्धा स्थगिती देण्यात आली होती. त्याविषयी नंतर मात्र कुठलेही शासननिर्णय जाहीर केले नाहीत. दरम्यान, आदिवासी विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली मात्र सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अद्याप जाहिरात प्रसिध्द केलेली नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागत आहे.राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांनी सर्वांशी चर्चा करून यात काय सुधारणा करता येतील, याबाबत शासनाला एक निवेदन सादर करीत विविध सूचना सुचवलेल्या आहेत.४० कोटी मंजूर ३५ कोटी परत घेतले६ जुलै २०२० रोजी राज्य सरकारने वर्ष २०२०-२१ मधली अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठीची राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमधील मंजूर ४० कोटी रुपये मंजूर व वितरित रकमेपैकी ३५ कोटी रुपये परत घेतले आहेत. आधीच या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांचे हित साधले जात नसताना, या योजनेला निधीची कमतरता असताना हा फंड परत काढून घेणे हा अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीSC STअनुसूचित जाती जमातीStudentविद्यार्थी