मेयो, मेडिकलमध्ये शिवथाळी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST2021-04-22T04:08:30+5:302021-04-22T04:08:30+5:30

नागपूर : नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवथाळी सुरू करा, अशी मागणी ...

Start Shivathali in Mayo, Medical | मेयो, मेडिकलमध्ये शिवथाळी सुरू करा

मेयो, मेडिकलमध्ये शिवथाळी सुरू करा

नागपूर : नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवथाळी सुरू करा, अशी मागणी विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) मुख्यमंत्र्यांना एका पत्रातून केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून यासंदर्भातील मागणी नोंदविली आहे. राज्यात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारने १० रुपयात शिवथाळी देण्याची योजना राबविली. त्याचा गरिबांना लाभ झाला. सध्या कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने रोजगार बंद आहेत. गरिबांचे हाल सुरू असून फेरीवाले, रिक्षाचालक या वर्गाची रोजीरोटी बंद झाली आहे. इलाजासाठी पैसा नसलेले ग्रामीण रुग्ण शहरातील या रुग्णालयांत येतात. दुकाने बंद असल्याने त्यांची उपासमार होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन या रुग्णालय परिसरातील शिवथाळी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

Web Title: Start Shivathali in Mayo, Medical