जागतिक पर्यटन दिन विशेष : ठप्प पडलेला विदर्भातील पर्यटन व्यवसाय दीड वर्षानंतर टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 06:24 PM2021-09-26T18:24:55+5:302021-09-27T11:48:16+5:30

विदर्भातील पर्यटनाचे मुख्य स्त्रोत वनपर्यटन आहे. अलीकडे निसर्ग पर्यटनावरही पर्यटन संचालनालयाकडून भर दिला जात असला तरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा विदर्भातील पर्यटनाचा व्यवसाय आजतरी वनपर्यटनावरच अवलंबून आहे.

The stalled tourism business in Vidarbha will resume after one and half year | जागतिक पर्यटन दिन विशेष : ठप्प पडलेला विदर्भातील पर्यटन व्यवसाय दीड वर्षानंतर टाकणार कात

जागतिक पर्यटन दिन विशेष : ठप्प पडलेला विदर्भातील पर्यटन व्यवसाय दीड वर्षानंतर टाकणार कात

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटनातून वाढणार गंगाजळीशिथिल निर्बंधांमुळे आशा पल्लवित, उद्योगांसह पर्यटनाला मिळणार वाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनलॉक प्रक्रियेनंतर राज्य सरकार निर्बंध शिथिल करीत असल्याने मागील दीड वर्षापासून ठप्प पडलेल्या विदर्भातीलपर्यटन व्यवसायाला पुन्हा जुने दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सरकारने या संदर्भात घोषणा करून या व्यवसायाला पुन्हा उभारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विदर्भातील पर्यटनाला नागपूरसह परिसरातील क्षेत्रात मोठा वाव आहे. या व्यवसायातून रोजगाराची संधी असली तरी कोरोना संक्रमणामुळे मागील दीड वर्षापासून हा व्यवसायच संकटात पडला होता. विदर्भातील पर्यटनाचे मुख्य स्त्रोत वनपर्यटन आहे. अलीकडे निसर्ग पर्यटनावरही पर्यटन संचालनालयाकडून भर दिला जात असला तरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा विदर्भातील पर्यटनाचा व्यवसाय आजतरी वनपर्यटनावरच अवलंबून आहे.

वाघ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. राज्यात सर्वाधिक वाघ ताडोबाच्या जंगलात असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. या सोबतच पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प तसेच पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामुळे रिसॉर्ट व्यवसायाला वाव मिळाला. ३५० च्या जवळपास वनपर्यटनावर अवलंबून असलेले रिसॉर्ट्स विदर्भात आहेत. वनव्याप्त गावातील तरुणांना जीप्सीचा रोजगार मिळाला. सुमारे ६५० जीप्सी व्यावसायिक आणि तेवढ्याच संख्येतील गाईड्स वन पर्यटनावर अवलंबून आहेत. मात्र दीड वर्षापासून वनपर्यटन बंद असल्याने या बेरोजगार तरुणांवर उपासमारीचे संकट होते. १ ऑक्टोबरपासून वनपर्यटन सुरू होत असल्याने ते आता दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

नागपूरच्या पर्यटनाला विविधांगी आयाम

वनपर्यटन, इको टुरिझम, हेरिटेज, मंदिरे असा विविधांगी आयाम नागपूरच्या पर्यटनाला आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीला वर्षभरात भेट देणाऱ्यांची संख्या लाखांवर असते. मात्र मागील दीड वर्षात कोरोना संक्रमणामुळे पर्यटकांना प्रतिबंध आहे. वनपर्यटनाला येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. नागपूरलगत असलेले पेंच, उमरेड व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, तसेच नव्याने सुरू झालेले स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

Web Title: The stalled tourism business in Vidarbha will resume after one and half year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.