एसटीला भ्रष्टाचारातून तोटा, जनतेवर दरवाढ का लादता ?
By कमलेश वानखेडे | Updated: January 25, 2025 16:51 IST2025-01-25T16:50:24+5:302025-01-25T16:51:50+5:30
Nagpur : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

ST is suffering from corruption, why are you imposing fare hikes on the public?
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. एसटी महामंडळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकार खतपाणी घालत आहे. यात एसटीचा तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ करून याचा भार गोरगरीब, सामान्य जनतेवर का लादता, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार उपस्थित केला.
नागपूर येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे. बस खरेदीचे कंत्राट आता सरकारने रद्द केले. एसटी दरवाढ ही गरिबांची लूट आहे, म्हणून ही दरवाढ मागे घ्यावी अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० हजार जागा या ओबीसींच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणशिवाय या निवडणुका होऊ नये, असे झाले तर ओबीसी समाज हे सहन करणार नाही, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला. आता जरांगे यांच्या आंदोलनांना धार राहिली नाही, वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रिपेट वीज मीटरला विरोध
आता वीज दरवाढ करून एक प्रकारे लूट लावली आहे. २३०० रुपयाचे स्मार्ट मीटर १२ हजार रुपयांना लावले जात आहे. अर्ध्या रात्री रिचार्ज संपला तर लाईन बंद होईल. प्रीपेड मिटर हे गतीने फिरणारे मीटर आहे. कोणाच्या फायद्यासाठी हे मीटर लावू नये, असेही वडेट्टीवार म्हणाले.