शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारताचा पाकिस्तान दौरा? क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचं सूचक विधान, चेंडू BCCI च्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 14:33 IST

Asia Cup 2023: आशिया चषक 2023च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वादंग सुरू आहे. 

Anurag Thakur on India’s travel to Pakistan । नागपूर : आशिया चषक 2023च्या (Asia Cup 2023) आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वादंग सुरू आहे. अशातच आशिया चषक 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार की नाही याचा निर्णय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) सोपवला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानंतरच क्रीडा मंत्रालय आणि गृह मंत्रालय याबाबत निर्णय घेईल असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

खरं तर आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, बीसीसीआय सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले की, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. पण यानंतर तत्कालीन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. 

 चेंडू BCCI च्या कोर्टातनागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सर्वप्रथम आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाबाबत निर्णय घेऊ द्या, त्यानंतरच क्रीडा मंत्रालय आणि गृह मंत्रालय निर्णय घेईल." एकीकडे पाकिस्तान आशिया चषक आपल्या देशात आयोजित करण्यावर ठाम आहे, तर दुसरीकडे भारताचे माजी क्रिकेटपटू सुरक्षेचे कारण देत शेजाऱ्यांवर निशाणा साधत आहे. अलीकडेच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा दाखला देत पाकिस्तानातील दहशतवाद आणि सुरक्षाव्यवस्था यावर टीका केली होती. 

हरभजनने साधला निशाणा "टीम इंडियाने पाकिस्तानात जाऊ नये हे निश्चित. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी असे मला वाटते. मला माहित नाही की आमचा संघ तिथे किती सुरक्षित असेल. पाकिस्तानातील परिस्थिती देखील सुरक्षेच्या कारणास्तव चांगली नाही. त्यांना यायचे असेल तर येऊद्या नसेल यायचे तर काही फरक पडत नाही. पाकिस्तानशिवाय भारतीय क्रिकेट चालू शकते. पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज भासू शकते. पण भारताला पाकिस्तानची गरज नाही", अशा शब्दांत हरभजनने पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAnurag Thakurअनुराग ठाकुरBCCIबीसीसीआयPakistanपाकिस्तानasia cupएशिया कप 2022