नागपुरात भरधाव कारच्या धडकेत व्यापारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:13 IST2018-06-15T20:12:51+5:302018-06-15T20:13:02+5:30
भरधाव कारची धडक बसल्याने एका तरुण व्यापाऱ्याचा करुण अंत झाला. भगवान मोहनदास वेनशियानी (वय ३४) असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून ते एलआयजी वसाहतीत राहत होते. वेनशियानी याचे पारडीच्या एचबी टाऊनमध्ये गुरू मेन्सवेअर नामक दुकान आहे.

नागपुरात भरधाव कारच्या धडकेत व्यापारी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव कारची धडक बसल्याने एका तरुण व्यापाऱ्याचा करुण अंत झाला. भगवान मोहनदास वेनशियानी (वय ३४) असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून ते एलआयजी वसाहतीत राहत होते. वेनशियानी याचे पारडीच्या एचबी टाऊनमध्ये गुरू मेन्सवेअर नामक दुकान आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर ते दुचाकीने घराकडे जात होते. भंडारा मार्गावरील सुदर्शन चौकात शालीमार स्टोर्ससमोर भरधाव मारुती कार (पीबी ५७/ २६५३) च्या चालकाने वेनशियानी यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. अपघातानंतर आरोपी कारचालक पळून गेला. चंदर नरेश हेमनानी (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. आरोपी कारचालकाची चौकशी सुरू आहे.