शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत चितळ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 19:45 IST

वेगात जात असलेल्या कारने रोड ओलांडणाऱ्या चितळाला जोरदार धडक दिली. त्यात त्या चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बांद्रा शिवारातील घटना : महामार्ग ओलांडताना दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (देवलापार) : वेगात जात असलेल्या कारने रोड ओलांडणाऱ्या चितळाला जोरदार धडक दिली. त्यात त्या चितळाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्ग क्रमांक - ७ वर सोमवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली.हा महामार्ग पेंच व्याघ्र प्रकल्प आणि मानसिंगदेव अभयारण्यातून गेला असून, या घनदाट जंगलाचा काही भाग प्रादेशिक वन विभागात येतो. या जंगलात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. चौपदरी असलेल्या या महामार्गावर अंदाजे तीन फूट उंचीचे टिनपत्र्यांचे दुभाजक लावले आहेत. दरम्यान, प्रादेशिकच्या देवलापार वन परिक्षेत्रात सदर चितळ महामार्ग ओलांडत होते.त्यातच शिवनी (मध्य प्रदेश) येथून देवलापार मार्गे नागपूरच्या दिशेने वेगात जात असलेल्या एमपी-२२/सीए-४५०१ क्रमांकाच्या त्या चितळाला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, कारचालक आशिषकुमार सूर्यवंशी रा. सुकतरा (मोहगाव), जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले. वृत्त लिहिस्तो या प्रकरणी पोलिसात गुन्ह्यांनी नोंद करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Accidentअपघातwildlifeवन्यजीवDeathमृत्यू