नागपूरमध्ये स्पीडचा कहर ! कार उलटली, चार तरुणांना झाली गंभीर दुखापत

By शुभांगी काळमेघ | Updated: September 22, 2025 18:18 IST2025-09-22T18:17:46+5:302025-09-22T18:18:35+5:30

रविवारी रात्रीचा ‘स्पीड ड्रामा’ : स्पीडिंग कार नागपूरात उलटली, रात्रीचा थरार थेट हॉस्पिटलपर्यंत!

Speeding in Nagpur! Car overturns, four youths seriously injured | नागपूरमध्ये स्पीडचा कहर ! कार उलटली, चार तरुणांना झाली गंभीर दुखापत

Speeding in Nagpur! Car overturns, four youths seriously injured

नागपूर : शहरातील झोन ३ परिसरात रविवारी रात्री एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रण सुटून पलटी झाली. या अपघातात कारमधील चार युवक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार अत्यंत वेगात चालवत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावरच उलटली. या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरु करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

अपघातात जखमी झालेल्या युवकांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघाताचा तपास संबंधित पोलीस विभाग करत असून, वाहन कोणाच्या मालकीची होती, चालक कोण होता आणि नेमका अपघात कसा घडला याचा शोध सुरू आहे. अपघात स्थळावर पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.
 

Web Title: Speeding in Nagpur! Car overturns, four youths seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.