नागपूर - ईटारसी थर्ड लाईनवर आज स्पीड ट्रायल, रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार तपासणी
By नरेश डोंगरे | Updated: December 25, 2025 22:22 IST2025-12-25T22:21:43+5:302025-12-25T22:22:05+5:30
Indian Railway: ईटारसी नागपूर दरम्यान तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या थर्ड लाईनवर मध्य रेल्वेकडून आज शुक्रवारी स्पीड ट्रायल घेतली जाणार आहे. चिंचोडा -मुलताई दरम्यान पूर्ण झालेल्या १५.२६ किलोमिटरच्या ट्रॅकवर रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीसीआरएस) यांच्या देखरेखित ही स्पेशल स्पीड ट्रायल (वेगाची चाचणी) घेतली जाणार आहे.

नागपूर - ईटारसी थर्ड लाईनवर आज स्पीड ट्रायल, रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार तपासणी
- नरेश डोंगरे
नागपूर - ईटारसी नागपूर दरम्यान तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या थर्ड लाईनवर मध्य रेल्वेकडून आज शुक्रवारी स्पीड ट्रायल घेतली जाणार आहे. चिंचोडा -मुलताई दरम्यान पूर्ण झालेल्या १५.२६ किलोमिटरच्या ट्रॅकवर रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीसीआरएस) यांच्या देखरेखित ही स्पेशल स्पीड ट्रायल (वेगाची चाचणी) घेतली जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात चिंचोडा मुलताई मार्गावर रेल्वेच्या थर्ड लाईन (तिसरा मार्ग) आधुनिक अभियांत्रिकी मानकांप्रमाणे पूर्ण करण्यात आले. जे काम पूर्ण झाले त्या मार्गात १ रोड ओव्हर ब्रीज (आरओबी) आणि २५ छोट्या पुलांची बांधणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एक लिमिटेड हाइट सबवे (एलएचएस)चाही समावेश आहे. लेव्हल क्रॉसिंग क्रमांक २६५ ची तरतूद करण्यात आली असून मुलताई स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग (पुनर्रचना) करण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे रेल्वे परिचालन क्षमता वाढणार आहे.
शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या वेग चाचणीदरम्यान ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट, सिग्नलिंग तसेच दूरसंचार यांसह सर्व तांत्रिक बाबींची सखोल तपासणी करण्यात येईल. त्यातूनच सर्वोच्च स्तराची सुरक्षितता निश्चित केली जाणार आहे.
गाड्या रेंगाळण्याचे प्रमाण कमी होणार
तिसरा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर व्यस्त असणाऱ्या या रेल्वे मार्गावर गाड्या रेंगाळण्याचे प्रमाण कमी होऊन प्रवासी तसेच मालवाहतूक अधिक गतीमान होईल. भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन रेल्वे पायाभूत सुविधाही सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.