सोयाबीन खरेदी मर्यादा एकरी किमान १२ क्विंटल करा; राज्यभर एकच मर्यादा करण्याची मागणी
By सुनील चरपे | Updated: December 11, 2025 15:30 IST2025-12-11T15:28:41+5:302025-12-11T15:30:18+5:30
Nagpur : एमएसपी दराने सोयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे.

Soybean purchase limit should be at least 12 quintals per acre; Demand for a single limit across the state
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमएसपी दराने सोयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. ही मर्यादा संपूर्ण राज्यभर एकच म्हणजेच हेक्टरी ३० क्विंटल (एकरी १२ क्विंटल) करणे गरजेचे आहे.
राज्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील सोयाबीनचे पेरणीक्षेत्र चार लाख हेक्टरपेक्षा अधिक असून, बुलढाणा, बीडचे तीन लाखांच्या वर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळचे दोन लाखांच्या वर, अहिल्यानगर, जालना, वर्धा व नागपूर जिल्ह्यांचे एक लाखाच्या वर, तर उर्वरित १२ जिल्ह्यांमधील सोयाबीनचे पेरणीचे पेरणीक्षेत्र एक लाखापेक्षा कमी आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहेत.
खरेदीत उत्पादकतेचा अडसर
सोयाबीन विक्री नोंदणी, खरेदीला विलंब व उत्पादकतेनुसार खरेदी मर्यादा ही संपूर्ण प्रक्रिया विचारात घेता, सरकारला शेतकऱ्यांकडील सोयाबीन एमएसपी दराने खरेदी करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी खरेदीत उत्पादकतेचा अडसर निर्माण केला जात असल्याने कृषी विभागाने आधी कमी आणि नंतर वाढीव उत्पादकता जाहीर केली, असे मत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मिलिंद दामले यांनी व्यक्त केले आहे.
सोयाबीन खरेदी मर्यादा (क्विंटल/प्रतिएकर)
जिल्हा जुनी वाढीव
१) नाशिक ६.०० ११.०६
२) धुळे ६.६० ८.४४
३) नंदुरबार ४.९९ ५.९६
४) जळगाव ६.८० १०.८०
५) अहिल्यानगर ५.८० १३.३०
६) पुणे ९.४० १४.६०
७) सोलापूर ६.०० ८.४४
८) सातारा ८.८० १२.४५
९) सांगली ९.३४ १५.३६
१०) कोल्हापूर ९.८० १७.३१
११) छ. संभाजीनगर ४.६८ ८.५३
१२) जालना ६.०० ६.४३
१३) बीड ७,०० १०.३०
१४) लातूर ८.०४ ११.०१
१५) धाराशिव ६.८० ९.३०
१६) नांदेड ५.४० ७.७१
१७) परभणी ५.३२ ८.०८
१८) हिंगोली ५.६० ७.३५
१९) बुलढाणा ६.०४ ७.६२
२०) अकोला ५.८० ७.०६
२१) वाशिम ८.१६ ९.१८
२२) अमरावती ६.८४ ८.४२
२३) यवतमाळ ५.७२ ६.५२
२४) वर्धा ६.२० ८.५३
२५) भंडारा ४.३० ५.८९
२६) नागपूर ३.०० ५.६१
२७) चंद्रपूर ६,०० ६.९१