शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कापसाला फुटले अंकुर :  नुकसानीचे पंचनामे करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 21:14 IST

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. पावसामुळे शेतात कापलेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर कापसाचे बोंड गळून पडले. पावसामुळे भिजलेले पीक शेतात पडून आहे.

ठळक मुद्देअधिकारी दिवाळीच्या सुट्यांवर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, परतीच्या पावसाने हिसकावून घेतला. पावसामुळे शेतात कापलेल्या सोयाबीनला अंकुर फुटले तर कापसाचे बोंड गळून पडले. पावसामुळे भिजलेले पीक शेतात पडून आहे. अधिकारी पंचनामे करतील, विमा कंपन्यांचे अधिकारी भेटी देतील, अशा अपेक्षेत शेतकरी आहे. मात्र दिवाळीच्या सुट्यात सर्व प्रशासन सुस्त आहे. अशात नुकसानीच्या पंचनाम्याची शेतकरी प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. 

जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या पट्ट्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगातील दाणे, कापसाची सरकी पावसात भिजल्याने, कोंब फुटले आहे. अस्मानी संकटामुळे शेतमालाची पत प्रचंड खालावली आहे. यावर्षी निसर्गाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची चेष्टा केली. हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारली. मध्यंतरी संततधार पावसाने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला. त्यातच ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. दमट वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला. पावसाने थोडीफार सवड देताच शेतकऱ्यांनी पिकांची आंतरमशागत करून कीटकनाशकाची फवारणी केली. त्यामुळे पिकांनी कसाबसा जोम धरला. दिवाळीच्या पूर्वी बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनची कापणी करून शेतात गंजी लावून ठेवली. काही पीक अजूनही शेतातच आहे. काही शेतातील कापूस वेचणीला सुद्धा आला. परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन वाचविण्याची सवड मिळाली नाही. त्यामुळे शेतात असलेले अथवा कापून ठेवलेल पीक पावसात चिंब भिजले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. 
नुकसान भरपाई मिळावी अशी स्वाभाविकच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पीकं शेतातच ठेवली आहे. अधिकारी येतील पंचनामे करतील, अशा अपेक्षेत शेतकरी आहे. पण दिवाळीच्या सुट्यांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. बुधवारीही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीरता कृषी विभागाच्या कार्यालयात दिसून आली नाही. कृषी विभागाचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात फार पाऊस झाला नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झालेले नसावे. प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या संगीत खुर्चीत व्यस्तसध्या सरकारचं नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना आदेश देणार तरी कोण?, संपुर्ण प्रशासन हे मुख्यमंत्र्याच्या संगीत खुर्चीत व्यस्त आहे. पगार घेणाºया अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही. त्यातच अधिकाऱ्यांना दिवाळीच्या सुट्यासुद्धा आहे. विम्याचे हप्ते कापले, नुकसान झाल्यावर विमावाले ढुंकून सुद्धा बघत नाही. शेतकऱ्यांबद्दल प्रशासनाची ही लाचारीच म्हणावी लागेल.राम नेवले, नेते, शेतकरी संघटना

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूर