शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मनपात दक्षिण-पश्चिमचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदी अविनाश ठाकरे यांची निवड झाली आहे, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदी अविनाश ठाकरे यांची निवड झाली आहे, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश भोयर यांची निवड केली जाणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी मनपाच्या ऑनलाईन विशेष सभेत स्थायी समिती अध्यक्षांसह १० विषय समित्यांच्या सभापतींच्या नावांची घोषणा केली. यात शिक्षण सभापती म्हणून प्रा. दिलीप दिवे, क्रीडा सभापतिपदी प्रमोद तभाने, जलप्रदाय समितीच्या सभापतिपदी संदीप गवई तर विधी समितीच्या सभापतिपदी मीनाक्षी तेलगोटे यांची निवड करण्यात आली आहे. सत्तापक्ष नेता व स्थायी समिती अध्यक्षासह महत्त्वाच्या समित्यांवर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची वर्णी लागल्याने सध्या मनपात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधनसभा क्षेत्राचा बोलबाला आहे.

विशेष सभेमध्ये स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजपचे पाच, काँग्रेसचे दोन व बसपाच्या एक सदस्याचा समावेश आहे. तर सत्तापक्ष नेते सदीप जाधव यांनी भाजपच्या १२ नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा केली. महापौरांनी समिती सभापतींची निवडणूक १ मार्चपूर्वी घेण्याचे निर्देश सचिवालयाला दिले.

कर संकलन व कर आकारणी समिती सभापतिपदी महेंद्र धनविजय यांना कायम ठेवण्यात आले आहे. स्थापत्य समिती सभापती म्हणून राजेंद्र सोनकुसरे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी दिव्या धुरडे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतिपदी दीपक चौधरी, दुर्बल घटक समिती सभापतिपदी कांता रारोकर आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती म्हणून हरीश दिकोंडवार, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती संजय महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

...

स्थापत्य व प्रकल्प समिती

राजेंद्र सोनकुसरे-सभापती, सदस्य निशांत गांधी, वैशाली रोहणकर, रूपा राय, दीपक वाडीभस्मे, वंदना भुरे, आशा उईके, मनोज गावंडे, वंदना चांदेकर.

....

आरोग्य समिती

महेश महाजन-सभापती, सदस्य विक्रम ग्वालबन्शी, विद्या कन्हेरे, नागेश मानकर, वीरेंद्र कुकरेजा, भाग्यश्री कानतोडे, पुरुषोत्तम हजारे, भावना लोणारे व ममता सहारे.

...

विधी समिती

मीनाक्षी तेलगोटे-सभापती, सदस्य वर्षा ठाकरे, राजकुमार साहू, वनिता दांडेकर, गोपीचंद कुमरे, राजेश घोडपागे, रमेश पुणेकर, नितीश ग्वालबन्शी, जितेंद घोडेस्वार.

...

शिक्षण समिती

दिलीप दिवे-सभापती, सदस्य सुमेधा देशपांडे, संगीता गिऱ्हे, परिणिता फुके, नागेश सहारे, यशश्री नंदनवार, बंटी शळके, संदीप सहारे, मो. इब्राहिम तौफीक अहमद.

...

गलिच्छ वस्ती सुधार, घरबांधणी

हरीश दिकोंडवार-सभापती, सदस्य रुतिका मसराम, खान नसीम बानो मो. इब्राहिम, कांता रारोकर, भारती बुंडे, विद्या मडावी, दिनेश यादव, साक्षी राऊत, वीरंका भिवगडे

...

क्रीडा समिती

प्रमोद तभाने-सभापती, सदस्य प्रमोद करौती, लखन येरवार, रूपाली ठाकूर, शेषराव गोतमारे, अमर बागडे, जिशान मुमताज मो. इरफान अन्सारी, हरीश ग्वालबन्शी, नरेंद्र वालदे.

...

महिला व बालकल्याण

दिव्या धुरडे-सभापती, सदस्य अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, निरंजना पाटील, रूपाली ठाकूर, सोनाली कडू, प्रणिता शहाणे, स्नेहा निकोसे, मंगला लांजेवार.

...

जलप्रदाय समिती

संदीप गवई-सभापती, सदस्य सरला नायक, मनीषा कोठे, जयश्री वाडीभस्मे, लहुकुमार बेहते, शिल्पा धोटे, भुट्टो जुल्फेकार अहमद, दिनेश यादव, वैशाली नारनवरे.

...

कर आकारणी व कर संकलन

महेंद्र धनविजय-सभापती, सदस्य सुनील अग्रवाल, शीतल कामडे, अनिल गेंडरे, विशाखा मोहोड, रूपा राय, किशोर जिचकार, रश्मी धुर्वे, संजय बुर्रेवार.

...

अग्निशमन व विद्युत समिती

दीपक चौधरी-सभापती, सदस्य किशोर वानखेडे, प्रमोद चिखले, सरिता कावरे, जयश्री रारोकर, मनोज चाफले, हर्षला साबळे, भुट्टो जुल्फेकार अहमद, जितेंद्र घोडेस्वार.