घरगुती भांडणातून तारसा येथे थरार; मुलाने केली वडिलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 14:33 IST2022-04-14T14:24:11+5:302022-04-14T14:33:41+5:30

या प्रकरणी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.

Son kills father who beats mother | घरगुती भांडणातून तारसा येथे थरार; मुलाने केली वडिलाची हत्या

घरगुती भांडणातून तारसा येथे थरार; मुलाने केली वडिलाची हत्या

मौदा (नागपूर) : मौदा तालुक्यातील तारसा येथे मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू यादव आग्रे (४५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारसा येथील राजू यादव आग्रे (४५) व त्याची पत्नी छाया राजू आग्रे यांचा बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वाद झाला. मुलगा राजू हा सून छाया हिला मारहाण करीत असल्याचे पाहून यादव आग्रे (८५) हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी तिथे पोहोचले. यावेळी राजू आग्रे याने त्यांना धक्का दिला. यात ते किरकोळ जखमी झाले.

आजोबांना दुखापत झाल्याचे पाहून राजू आग्रे यांचा मुलगा आई-वडिलांचा वाद सोडविण्यासाठी तिथे आला. यानंतर राजू आग्रे हा पत्नी छाया हिला मारहाण करीत असल्याचे पाहून घरात असलेल्या कुऱ्हाडीने मुलाने वडिलांच्या डोक्यावर वार केला. यात राजू हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी विधिसंघर्ष बालकाला मौदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास ठाणेदार हेमंतकुमार खराबे करीत आहेत.

Web Title: Son kills father who beats mother