शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सॉफ्टवेअर, बनावट आयडीने तात्काळ ई-तिकीटांवर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:06 IST

दिवाळीत रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे बंद झाले आहे. दुसरीकडे इंटरनेटवर उपलब्ध अवैध सॉफ्टवेअर आणि बनावट आयडीच्या साहाय्याने दलाल तात्काळ ई-तिकिटांवर दरोडा टाकत आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला हॅक करण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाच्या स्तरावर हा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही. रेल्वे सुरक्षा दल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांची धरपकड करीत आहे.

ठळक मुद्देआयआरसीटीसीची वेबसाईट होतेय ‘हॅक’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीत रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे बंद झाले आहे. दुसरीकडे इंटरनेटवर उपलब्ध अवैध सॉफ्टवेअर आणि बनावट आयडीच्या साहाय्याने दलाल तात्काळ ई-तिकिटांवर दरोडा टाकत आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला हॅक करण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाच्या स्तरावर हा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही. रेल्वे सुरक्षा दल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांची धरपकड करीत आहे.‘लोकमत’ने ई-तिकिटांच्या काळाबाजाराबाबत बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या वेबसाईटवर कोणतीही व्यक्ती आपली खासगी माहिती टाकून ई-तिकीट खरेदी करू शकते. आयआरसीटीसीचे लायसन्स मिळालेले दलाल ठरवून दिलेले शुल्क आकारून प्रवाशांना तिकीट पुरवू शकतात. परंतु प्रवाशांना कन्फर्म तिकीट हवे असते. अशा स्थितीत तात्काळ ई-तिकीटाच्या विक्रीच्या वेळी दलाल अवैध सॉफ्टवेअरचा वापर करतात. प्रत्येक प्रवाशाकडून ते २०० ते ५०० रुपये अधिक शुल्क आकारतात. आयआरसीटीसीचे लायसन्स असलेले एजंटच हा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्याकडून जाणून घेतले असता ते म्हणाले, तात्काळ ई-तिकिटांच्या बुकिंगची वेळ ठरलेली आहे. यावेळी सामान्य प्रवासी तिकीट घेऊ शकतात. अर्ध्या तासानंतर दलाल तात्काळ ई-तिकीट बुक करू शकतात. परंतु अर्ध्या तासानंतर त्यांच्या वाट्याला अधिक तिकिटे येत नाहीत आणि त्यांचे ग्राहक सुटतात. अशा स्थितीत दलाल इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अवैध रेडमिर्चीसारख्या सॉफ्टवेअरची मदत घेतात. हे सॉफ्टवेअर सुरुवातीला मोफत असते. त्यानंतर सॉफ्टवेअर विकसित करणारे त्याचे शुल्क आकारतात. दलाल या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रवाशांची आणि प्रवासाची माहिती, पेमेंटची पद्धती आदी माहिती संगणकात फीड करून ठेवतात. जसा तात्काळ ई-तिकिटाच्या बुकिंगसाठी वेबसाईट आणि काऊंटर उघडतात, दलाल सॉफ्टवेअरने वेबसाईटला एकाप्रकारे हॅक करतात. त्याद्वारे सर्वात आधी त्यांना कन्फर्म तिकीट मिळते. लायसन्स असलेल्या एजंटला तिकिटांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. ते अधिक तिकीट बुक करण्यासाठी पर्सनल आयडीऐवजी बनावट माहिती वेबसाईटवर टाकून अनेक बनावट आयडी तयार करून सॉफ्टवेअरच्या मदतीने ई-तिकीट बुक करतात. या प्रकारे सामान्य प्रवाशांना मोजकेच ई-तिकीट मिळतात. ते सुद्धा कन्फर्म असतील याचा नेम नाही.रेल्वे बोर्ड स्तरावर उपाययोजना आवश्यक‘आरपीएफच्या अधिकाऱ्यांना इंटरनेटवरील अवैध सॉफ्टवेअरमुळे होत असलेल्या काळाबाजाराची माहिती मिळविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे, आयआरसीटीसीच्या वेबसाईटला सक्षम बनविणे, इंटरनेटवरील अवैध सॉफ्टवेअर ब्लॉक करणे, अवैध आयडीद्वारे होत असलेला तिकिटांच्या काळाबाजाराची माहिती मिळविणे आणि विभागीय स्तरावर सायबर सेल सुरू करण्याची विनंती रेल्वे बोर्डाला करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास ई-तिकिटांचा काळाबाजारा पूर्णपणे बंद होऊ शकतो. आरपीएफ काळाबाजार करणाऱ्या दलालांची धरपकड करीत आहे. प्रवाशांनीही अधिकृत एजंटकडून ई-तिकीट खरेदी करावे.’ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, नागपूर विभाग

 

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट