शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

...तर नागपुरात येताच कशाला? औपचारिकतेचा ‘फार्स’, हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 02:16 IST

महाविकासआघाडीच्या शासनकाळातील पहिले अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे.

नागपूर : मागील सहा दशकांपासून उपेक्षित असलेल्या विदर्भाला कधीतरी ‘अच्छे दिन’ येतील व ‘मायबाप सरकार’ येथील जनता व शेतकऱ्यांना न्याय देईल, अशी अपेक्षा दर हिवाळी अधिवेशनात व्यक्त होते. परंतु दरवेळी वैदर्भीयांच्या पदरी निराशाच येते. त्यामुळेच विदर्भात येताच कशाला? केवळ सहलीसाठीच का? असा प्रश्न वैदर्भीयांनी उपस्थित केला आहे. अधिवेशनातील औपचारिकतेचा ‘फार्स’ असेच याला म्हणावे का, असे विचारले जात आहे.महाविकासआघाडीच्या शासनकाळातील पहिले अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. याचा कालावधी सहा दिवसाचा राहण्याची दाट शक्यता आहे. या दिवसात सभागृहाचे कामकाज होणार तरी किती आणि विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणार तरी किती? त्यामुळेच विदर्भातील जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.नागपूर करारानुसार उपराजधानीत वर्षातून एक अधिवेशन घेणे अनिवार्य आहे. हे अधिवेशन महिनाभराचे तरी असले पाहिजे. मात्र सुरुवातीच्या काळापासून सर्वच शासनकर्त्यांनी हिवाळी अधिवेशनाला फारसे गंभीरतेने घेतलेच नाही.सचिवालय सोमवारपासून नागपुरातहिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी आवश्यक कागदपत्रासह नागपुरात पोहोचले आहेत. शुक्रवारी जवळपास ५०० कर्मचारी दाखल झाले. येत्या सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरु होईल.नागपुरात आजवर झालेली अधिवेशने व कंसात कामकाजाचे दिवस१९६० (२७ दिवस), १९६१ (२५ ), १९६४ (२३), १९६५ (१५), १९६६ (२४), १९६७ (१७) , १९६८ (२८) , १९६९ (२४ ), १९७० ( १८), १९७१ (२६), १९७२ (२०) , १९७३ (२५), १९७४ (२५ ), १९७५ (१७ ), १९७६ (१५), १९७७ (१४), १९७८ (१४), १९८० (९) १९८१ (१५), १९८२ (१०), १९८३ (१५), १९८४ (६), १९८६ (१५), १९८७ (१५), १९८८ (१५), १९८९ (५) , १९९० (१४) , १९९१ (१४), १९९२ (६), १९९३ (१४), १९९४ (८), १९९५ (१४), १९९६ (१०), १९९७ (८), १९९८ (१२), १९९९ (१०), २००० (१५), २००१ (१०), २००२ (८), २००३ ( १०), २००४ (११), २००५ (१०), २००६ ( १०), २००७ ( ११), २००८ (१२) २००९ (१०), २०१० (१२), २०११ (११), २०१२ (१०), २०१३ (१०), २०१४ (१३), २०१५ (१३), २०१६ (१०), २०१७ (१०), २०१८ (एकमेव पावसाळी अधिवेशन - १३ दिवस)

टॅग्स :nagpurनागपूर