शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

- तर महिन्याला पाच लाखाचा दंड : गावातील सांडपाण्यामुळे कोलार प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 9:49 PM

गावातून निघणारी घाण व सांडपाण्यामुळे कोलार नदी प्रदूषित होत आहे. यावर जिल्हा परिषदेने तात्काळ उपाययोजना न केल्यास, दर महिन्याला ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल, अशी नोटीस राष्ट्रीय हरित लावादाने जिल्हा परिषदेला बजावली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय हरित लवादाची जिल्हा परिषदेला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावातून निघणारी घाण व सांडपाण्यामुळे कोलार नदी प्रदूषित होत आहे. यावर जिल्हा परिषदेने तात्काळ उपाययोजना न केल्यास, दर महिन्याला ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल, अशी नोटीस राष्ट्रीय हरित लावादाने जिल्हा परिषदेला बजावली आहे.जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील (चिचोली) खापरखेडा व (पोटा) चनकापूर या ग्रामपंचायतींमधील घाण व सांडपाणी लगतच्या कोलार नदीला जाऊन मिळते. यामुळे नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील सांडपाण्याच्या रूपाने नदीत मिळणाऱ्या पाण्याला रोखण्यासाठी सिव्हेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी) निर्माण करा. सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पाणी प्रदूषणविरहित करा, अशा सूचना हरित लवादाने दिल्या आहेत. येत्या मार्च २०२१ पर्यंत कुठलीही उपाययोजना केली नाही तर मार्च २०२१ नंतर महिन्याला ५ ते १० लाख रुपये दंड भरण्यास तयार राहावे, असे स्पष्ट केले अहे. लवादाने बजावलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर जि.प.तील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता मिशनचे डेप्युटी सीईओ यांनी नुकत्याच या दोन्ही गावांना भेटी देऊन त्याची पाहणी केली. याचसंदर्भात सीईओ योगेश कुंभेजकर यांच्या कक्षात एमजीपी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सिव्हेज ट्रीटमेंट प्लान्ट उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कोलार नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व दूषित पाणी नदीत वाहून जाऊ नये यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण उपाययोजना जि.प.ला सुचविणार आहेत. पण मार्च २०२१ पर्यंत जर याबाबत कुठलीही उपाययोजना न केल्यास जि.प.ला महिन्याला ५ ते १०ा लाखाचा दंड भरावा लागणार, हे निश्चित असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर