शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका : तज्ज्ञाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 21:31 IST

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर कोरोना व्हायरसशी संबंधित प्रश्न विचारण्यात येत आहेत. यात धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. ‘पीआयबी’ने ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देसरकारनेही वेधले लक्ष

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला सिगारेट पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर कोरोना व्हायरसशी संबंधित प्रश्न विचारण्यात येत आहेत. यात धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. ‘पीआयबी’ने ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.सरकारने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर लोकांनी सिगारेट आणि तंबाखू खाल्ल्याने कोरोना व्हायरसचा धोका आहे का, असे प्रश्न विचारले होते. तज्ज्ञानुसार, सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन करण्यासाठी हात ओठाचा वापर केला जातो. यामुळे हा विषाणू पोटात जाऊ शकतो आणि कोरोनाची लागण होऊ शकते.दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्पष्ट केले आहे की, सिगारेट व तंबाखूचे सेवन करणाºया व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका आहे. त्यामुळे हे व्यसन सोडावे. याबरोबरच पौष्टिक आहार, पूर्ण झोप घ्यावी. घरातच राहून नियमित व्यायाम करावा, असा सल्लाही दिला आहे.धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा गंभीर धोकाधूम्रपान करणाऱ्यांना श्वसनासंबंधित आजाराची भीती असते. अशावेळी त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यास आजार गंभीर होऊ शकतो. शिवाय, तंबाखू चोळणे किंवा सिगारेट ओढताना हात हायजेनिक राहतातच असे नाही. विशेष म्हणजे, ‘लॉकडाऊन’मुळे सध्या सर्व पानठेले बंद आहेत. व्यसन सोडण्याची ही एक संधी आहे.डॉ. अविनाश गावंडेवैद्यकीय अधीक्षक, मेडिकलधूम्रपानाचे व्यसन घातकचतंबाखू व धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. यामुळे हे व्यसन घातकच आहे. विशेष म्हणजे, क़र्करोगाच्या रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. यामुळे या रुग्णाला कोरोना झाल्यास गंभीर परिणामाची भीती असते. सध्या कोरोनाचा संसर्ग सर्वत्र आहे. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी चेहऱ्याला वारंवार हात न लावण्याचे आवाहन केले जात आहे. यात जर कुणाला धूम्रपानाची सवय असेल तर त्याचे हात वारंवार ओठाला लागतील, यातून कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे हे व्यसन सोडणेच लाभदायक ठरेल.डॉ. अशोक दिवाणप्रमुख, कर्करोग विभाग, मेडिकल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSmokingधूम्रपान