नागपूर : नियतीच्या खेळामुळे जन्मत:च किंवा काही कारणांनी आलेल्या शारीरिक व्यंगामुळे अनेक चिमुकल्यांचे आयुष्य अंधारमय होते. एका बाजूला शारीरिक व्यंगामुळे वाट्याला येणारी कुचेष्टा आणि दुसऱ्या बाजूला गरिबीमुळे उपचारांबाबत असलेली हतबलता... असा दुहेरी संघर्ष हे दिव्यांग आणि त्यांचे पालक रोज जगत असतात. पण, शनिवारी नागपुरात एका अनोख्या शिबिराने या अंधारात आशेचा एक किरण आणला. आजचा दिवस २५ मुलांच्या चेहºयावर एक निखळ हास्य आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन उजाडला.
निमित्त होते, डॉ. दंदे फाउंडेशन, सुश्रुत इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि मातृ सेवा संघाच्या 'तारांगण' प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'सर्जिकल करेक्शन' शिबिराचे. शनिवारी सकाळी ६ वाजेपासून या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. दिवसभरात २५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरात डॉ पिनाक दंदे यांच्या नेतृत्वात डॉ. सीमा दंदे, डॉ. सुशांत मुळे, आणि डॉ दंदे हॉस्पिटलच्या परिचारिका गीता माने आणि डॉ. सुश्रृत बाभूळकर यांच्या नेतृत्वात डॉ. अमोल पाटील, डॉ. श्रीशैल शहाणे, डॉ. सुवर्णा विघ्ने, डॉ. रिता वहाणे, डॉ. चौरे, डॉ. ठाकूर, डॉ लविना, संगीता सिस्टर आणि आकाश ब्रदर, भूलतज्ज्ञ डॉ. गिरीश ठाकरे, मातृ सेवा संघाच्या तारांगण उपक्रमाच्या प्रमुख डॉ. मृणाली देशमुख आणि फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉ. सारा अंबादे यांनी सेवा दिली.
दिव्यांगांंना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
डॉ. दंदे म्हणाले, शारीरिक व्यंगामुळे आलेला न्यूनगंड दूर करून या मुलांना खºया अर्थाने आयुष्य जगता यावे, यासाठी या शस्त्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने सामील होऊ शकतात. ज्यांना अशा शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांनी मातृ सेवा संघाच्या 'तारांगण'शी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
रुग्णसेवेचा कृतकृत्यताचा अनुभव
रुग्णसेवेचे समाधान व्यक्त करताना डॉ. बाभूळकर म्हणाले, जेव्हा एखादा दिव्यांग शस्त्रक्रियेनंतर कोणताही न्यूनगंड न बाळगता, हसतमुखाने समाजात वावरताना दिसतो, ते पाहताना एका डॉक्टरला खºया अर्थाने कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. जोवर समाजातील शेवटचा दिव्यांग व्यंगमुक्त होत नाही, तोवर आमचे हे प्रयत्न अविरत सुरूच राहतील, असा विश्वास 'तारांगण'च्या डॉ. मृणाली देशमुख यांनी व्यक्त केला. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हिक्टोरिया सोनी, विभा देशपांडे आणि विशाखा बागडे यांनी घेतलेले परिश्रम मोलाचे ठरले.
Web Summary : A surgical camp in Nagpur brought smiles to 25 differently abled children, offering them a chance at a better life. The camp, organized by multiple foundations, provided free surgeries to correct physical deformities, boosting confidence and enabling social inclusion.
Web Summary : नागपुर में एक सर्जिकल कैंप ने 25 दिव्यांग बच्चों के जीवन में मुस्कान ला दी, जिससे उन्हें बेहतर जीवन का अवसर मिला। कई फाउंडेशन द्वारा आयोजित शिविर ने शारीरिक विकृतियों को ठीक करने, आत्मविश्वास बढ़ाने और सामाजिक समावेश को सक्षम करने के लिए मुफ्त सर्जरी प्रदान की।