शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

स्मार्ट सिटीसाठी हवे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट : गौरव चौकसे यांनी दिला फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 9:17 PM

शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी.टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी आयडिया चॅलेंजमध्ये ठरला अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. तुलनेत रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पार्किंगच्या समस्या उद्भवल्या आहेत. नागपुरातील स्मार्ट सिटी साकारत असली तरी, वाहतूक व्यवस्था आजही जुनीच आहे. शहरात पाच हजार कोटीची मेट्रो धावली तरी या समस्या सुटणार नाही, कारण त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. माहिती तंत्रज्ञानात बी.टेक. आणि एमबीएची पदवी घेतलेल्या आणि ग्रीसमध्ये एका खासगी कंपनीला सेवा देणाऱ्या नागपुरातील गौरव चौकसे यांनी नागपूर मनपाला स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटची आयडिया दिली. मनपाच्या स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये त्यांची आयडिया अव्वल ठरली.महापालिकेने २०१५ मध्ये स्मार्ट सिटीसाठी काही आयडिया मागितल्या होत्या. यातील पहिल्या तीन आयडिया देणाऱ्यांना मनपा शहराचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविणार होती. त्यांना पुरस्कृतही करणार होती. मनपाने त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केले होते. नागपुरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्याला प्रतिसाद देत १४०० आयडिया मनपाला पाठविला. यातून गौरवने दिलेली आयडिया प्रथम ठरली होती. गौरवने हा प्रोजेक्ट तयार करताना, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला. त्यातून काही त्रुटी काढल्या. पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था लक्षात घेतली. त्यावर अभ्यास करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली. त्याने नागपूर झूम अ‍ॅप तयार केले. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीवर फोकस केले.जीपीएसने केली सार्वजनिक वाहतूक ट्रॅकगौरवने तयार केलेल्या प्रोजेक्टमध्ये सर्वात प्रथम त्याने सिटी बसवर फोकस केले. कारण आजही नागपूरकरांमध्ये शहर बससंदर्भात संभ्रम आहे. बसची निश्चित वेळ, थांबे याबाबत माहिती नाही. गौरव जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसला लावून अ‍ॅपच्या माध्यमातून बसची इत्थंभूत माहिती मोबाईलद्वारे नागरिकांना मिळणार होती. ओला, उबेर या खासगी प्रवासी वाहनांप्रमाणे ही यंत्रणा संचालित होणार होती. त्याचा डेमोसुद्धा गौरवने दिला होता.स्मार्ट सिग्नलशहरातील वाहतुकीच्या समस्येचे मूळ म्हणजे सिग्नलचे मॅनेजमेंट नाही. शहर स्मार्ट होताना वाहतुकीची व्यवस्था स्मार्ट झाली नाही. रस्त्यावर वाहतूक कितीही असली तरी, आपल्या सिग्नलमध्ये ३० सेकंदचा टाईम सेट आहे. गौरवने शहरातील सिग्नलला सेंसरच्या माध्यमातून ऑपरेट करण्याची आयडिया दिली होती. यातून सिग्नल वाहतुकीची स्थिती लक्षात घेता ऑटोमॅटिक ऑपरेट होणार होते. त्यामुळे आज जसा आपत्कालीन वाहतूक व्यवस्थेला फटका बसतो तो या यंत्रणेमुळे बसणार नव्हता.पार्किंगच्या समस्येवरही दिला पर्यायशहरातील विशेषकरून बाजारपेठ परिसरात पार्किंगची बिकट समस्या निर्माण झाली होती. कारण चारचाकी वाहने झपाट्याने वाढली आहेत. लोकांना अजूनही पार्किंगच्या जागा माहिती नाही. गौरवने तयार केलेला नागपूर झुम अ‍ॅप पार्किंगची समस्या सोडविण्यास महत्त्वाचा ठरणार होता.पण आयडिया आता धूळखात आहे२०१५ मध्ये या आयडिया मनपाला दिल्या होत्या. मनपा त्याची अंमलबजावणी करणार होती. चांगल्या आयडियांना पुरस्कृत करून, पहिल्या तीन आयडियांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविणार होती. पण आज या आयडिया धूळखात पडल्या आहेत. २०१५ च्या आयडिया २०१९ मध्ये पुरस्कृत करण्यात आल्या आहे. अजूनही कुणाला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविले नाही, याची खंतही गौरवने व्यक्त केली.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीTrafficवाहतूक कोंडी