शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ साठी करा स्मार्ट सूचना

By admin | Updated: August 11, 2015 04:08 IST

स्मार्ट सिटी होण्यात सर्वसामान्यांचाही सहभाग असावा, यासाठी महापालिकेने आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे.

नागपूर : स्मार्ट सिटी होण्यात सर्वसामान्यांचाही सहभाग असावा, यासाठी महापालिकेने आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे. वेबसाईट सुरू करून यात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तज्ज्ञांची समिती आलेल्या सूचनातून १० स्मार्ट सूचनांची निवड करणार आहे. यात सर्वाधिक चांगल्या सूचना करणाऱ्यांना शहराचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर होण्याचा बहुमान मिळणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा यासाठी मनपाने आयडिया चॅलेंज (संकल्पना स्पर्धा)आयोजित केली आहे. यात शहरातील नागरिक स्मार्ट सिटीसाठी योग्य सूचना करू शकतात. सूचना आॅनलाईन देण्याची सुविधा असून सोबतच मनपा मुख्यालय व झोन कार्यालयात ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. १२ ते २७ आॅगस्टदरम्यान सर्वसामान्य नागरिक आपल्या कल्पक सूचना देऊ शकतात. मनपा, नीरी, व्हीएनआयटी, नासुप्र व सामाजिक विद्यालयाच्या सहा सदस्यांची समिती चांगल्या २० सूचनांची निवड करणार आहे. यातील सर्वाधिक उत्तम १० सूचनांची निवड केंद्र व राज्यस्तरावरील तज्ज्ञ करणार आहे. सर्वाधिक चांगल्या १० सूचना देणाऱ्यांना प्रत्येकी १० हजारांचा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रथम पुरस्कार २५ हजारांचा असून सर्वव्यापी व सर्वंकष कल्पनांना इनक्युबेशन फंडच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. (प्रतिनिधी)संघटनांचे प्रस्ताव स्वीकारणारशहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊ न स्मार्ट सिटीसंदर्भात त्यांच्या कल्पना व सूचना जाणून घेणार आहोत. यात कोणत्याही स्वरूपाचा राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याची माहिती दटके यांनी दिली. स्मार्ट सिटीसाठी येथे सूचना करा४विशेष संकेत स्थळ -डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट स्मार्ट सिटी नागपूर कॉम४झोन कार्यालयात ड्रॉप बॉक्स४ई-मेल संपर्क स्मार्ट सिटी आयडिया अ‍ॅट द रेट जी मेल डॉट कॉमरस्त्यांची सूचना नको स्मार्ट सिटीसाठी अभिप्रेत असलेल्या सूचना स्वीकारल्या जातील. सामाजिक व शहर विकासाच्या दृष्टीने उपयुक्त सूचनांचा स्वीकार केला जाईल. यात रस्ते, पाण्याची पाईपलाईन अशा सूचनांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी दिली. स्वच्छतेत माघारल्याचा शोध घेणारनागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीयस्तरावर २५६ वा क्रमांक मिळाला आहे. वास्तविक २००९ मध्ये नागपूर शहर २३९ क्रमांकावर होते. शहराची पिछेहाट का झाली, यामागील कारणांचा शोध घेणार असून याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मागितल्याची माहिती दटके यांनी दिली.