शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट अ‍ॅप ‘रिचो’

By admin | Updated: November 27, 2015 03:08 IST

कोणत्याही शहरातील नागरिकांनी स्मार्ट झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची कल्पना शक्य नाही. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला मोबाईल अ‍ॅपसारख्या तंत्रज्ञानाची जोड नागपूरच्या...

निशांत वानखेडे  नागपूर कोणत्याही शहरातील नागरिकांनी स्मार्ट झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची कल्पना शक्य नाही. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला मोबाईल अ‍ॅपसारख्या तंत्रज्ञानाची जोड नागपूरच्या तरुण अभियंत्यांनी दिली आहे. प्रशासनाला या अ‍ॅपशी जोडल्यास नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविणे शक्य होईल, असा विश्वास या तरुणांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. केतन पैठणकर, सागर घोंगे आणि प्रतीक चांद्रायण या तिघांसोबत इतर पाच तरुणांच्या टीमने ‘रिचो’ नावाचे हे अ‍ॅप निर्माण केले आहे. केतन याने अमेरिकेच्या विचीता स्टेट विद्यापीठात आणि प्रतीक याने मिशीगन विद्यापीठातून अभियांत्रिकीची मास्टर्स डिग्री संपादन केली आहे तर सागर याने आयआयटी पवई(मुंबई) येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. बहुतेक नागरिकांजवळ आज स्मार्ट फोन आहे. वॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल साईट अ‍ॅपवर त्वरित प्रतिक्रिया देणाऱ्यांचे हे जग आहे. शहरातील नागरिकांजवळ असेच एखादे अ‍ॅप असावे. हे अ‍ॅप प्रशासकीय यंत्रणेशी जोडले असावे आणि नागरी समस्येबाबत प्रशासनाकडून त्वरित प्रतिक्रिया(क्विक रिस्पॉन्स) मिळाली तर, याच विचारातून या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आल्याचे केतन पैठणकर याने सांगितले. विशेष म्हणजे केवळ समस्याच नाही तर, न्यूज, आपले विचारही रिचो अ‍ॅपवर पोस्ट करु शकत असल्याचे प्रतीक चांद्रायण याने सांगितले. हे अ‍ॅप पूर्णपणे त्या शहरातील नागरिकांसाठीच असून २५ किलोमीटरच्याच रेंजमध्ये सुरू राहणार असल्याचेही प्रतीकने स्पष्ट केले. नागरिकांना शहरातील घडामोडीबाबत अपडेट ठेवण्याचे काम हे अ‍ॅप करणार असल्याचे प्रतीकने सांगितले.