गळफास घेऊन सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 08:55 PM2023-02-18T20:55:11+5:302023-02-18T20:56:44+5:30

Nagpur News अज्ञात कारणावरून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी, १६ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे.

Sixth standard student committed suicide by hanging herself | गळफास घेऊन सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

गळफास घेऊन सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

googlenewsNext

नागपूर : अज्ञात कारणावरून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी, १६ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. अश्विनी संपत झोडे (१२, शिवनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

ती सहाव्या वर्गात शिकत होती. अश्विनीची आई मजुरी करते. तिला एक भाऊ असून, तो आठव्या वर्गात शिकतो. ते शिवनगरात भाड्याच्या खोलीत राहतात. घटनेच्या वेळी अश्विनीची आई कामावर गेली होती. तर मोठा भाऊ बाहेर खेळायला गेला होता. तिने आपल्या घरात छताच्या फंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तिने आत्महत्या केल्याची बाब घरमालक आणि शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्या आईला सूचना दिली. तिची आई सारिका संपत झोडे (३२) यांनी दिलेल्या सूचनेवरून पारडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अश्विनीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Sixth standard student committed suicide by hanging herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू