ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कॉटेजमागे सहा फुटाची धामण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:38 IST2018-07-08T00:36:58+5:302018-07-08T00:38:53+5:30

Six feet of dhaman snake behind the cottage of Rural Development Minister Pankaja Munde | ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कॉटेजमागे सहा फुटाची धामण

ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कॉटेजमागे सहा फुटाची धामण

ठळक मुद्देसर्पमित्र घटनास्थळी : सुरक्षितस्थळी सोडले

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कॉटेजमागे शनिवारी सहा फुटाची धामण आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली. यापूर्वीही रविभवन परिसरात साप दिसून आला होता.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांना साप दिसून आला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती बांधकाम विभागाच्या कक्षाला दिली. बांधकाम विभागाने सर्पमित्रांची नियुक्ती केली आहे. माहिती मिळाताच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सापाला पकडून सुरक्षितस्थळी सोडले.

Web Title: Six feet of dhaman snake behind the cottage of Rural Development Minister Pankaja Munde