शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेल निर्मुलनासाठी प्रत्येक गर्भवतीची सिकलसेल तपासणी आवश्यक

By सुमेध वाघमार | Updated: February 9, 2026 17:31 IST

Nagpur : सिकलसेल मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेची सिकलसेल तपासणी होणे अनिवार्य आहे.

नागपूर: सिकलसेल मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेची सिकलसेल तपासणी होणे अनिवार्य आहे. जर माता बाधित असेल, तर पित्याची तपासणी आणि त्यानंतर गर्भाची वैद्यकीय चाचणी करून वेळीच निर्णय घेणे हाच या आजाराला रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ बालरोग व सिकलसेल तज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन यांनी केले.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर येथे राज्यातील पहिल्या ‘सिकलसेल वेलनेस हब’चे उद्घाटन सोमवारी पार पडले. याप्रसंगी आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. उद्घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, ‘एनएनइएफ’चे मॅनेजिंग ट्रस्टी विक्रांत श्रोत्रीय आणि ‘नॅस्को’चे सचिव गौतम डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मेडिकलचे उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलावार, डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे,  औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी व स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. मंजुश्री वाईकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

मुलांच्या 'हायड्रॉक्सीयुरिया' गोळ्यांची गरज

डॉ. जैन यांनी प्रशासनाचे लक्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधले. सध्या सरकारी रुग्णालयांत 'हायड्रॉक्सीयुरिया' हे औषध कॅप्सूल स्वरूपात आहे, जे लहान मुलांना गिळण्यास त्रास होतो. त्याऐवजी पाण्यात विरघळणाºया गोळ्या सर्व शासकीय रुग्णालयांत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

वयाच्या पाच वर्षांनंतर डोळे, किडनीची तपासणी

सिकलसेलबाधित मुलांच्या अवयवांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी वयाच्या पाच वर्षांनंतर त्यांची नियमित किडनी, यकृत, डोळे आणि हृदयाची तपासणी होणे गरजेचे आहे. यामुळे आजाराचे निदान पहिल्या टप्प्यात होऊन उपचार सोपे होतील, असा सल्लाही डॉ. जैन यांनी दिला. 

मेडिकलमध्ये बोनमॅरो ट्रान्सप्लांट 

अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सिकलसेल रुग्णांसाठी मोठी घोषणा केली. पुढील सहा महिन्यांत मेडिकलमध्ये 'बोनमॅरो ट्रान्सप्लांट' केंद्र कार्यान्वित होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना अत्यंत हा महागडा उपचार माफक दरात उपलब्ध होतील. सकलसेल निर्मूलनासाठी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन जनजागृतीचे केंद्र बनणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sickle cell eradication: Every pregnant woman needs sickle cell screening.

Web Summary : Early sickle cell testing for pregnant women is vital for eradication. Expert Dr. Jain advocates for accessible medication and regular screenings. Bone marrow transplant center to open soon, offering affordable treatment.
टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर